व्हाट्सॅप यूजर्सना मिळेल नवीन रिस्ट्रिक्टेड ग्रुप फीचर, जाणून घ्या काय आहे विशेष
नवीन ग्रुप सेटिंग सेक्शन मधून अॅडमिन नवीन ग्रुप अॅडमिन पण निवडू शकतात.
व्हाट्सॅप मेसेजिंग प्लॅटफार्म आपल्या अॅप मध्ये अनेक बदल करत आहे, त्यातील एका मुळे ग्रुप अॅडमिन इतर ग्रुप पार्टिसिपेंट्सना ग्रुप इन्फो मध्ये बदल करण्या पासून रोखू शकतो. व्हाट्सॅप ने या वर्षाच्या सुरवातीला ग्रुप इन्फो सेक्शन लॉन्च केला होता, ज्यातून यूजर्स ग्रुप साठी डिस्क्रिप्शन सेट करू शकतात.
जेव्हा पासून या फीचर ची सुरवात झाली आहे, ग्रुप चा कोणताही सदस्य डिस्क्रिप्शन मध्ये बदल करू शकत होता, पण या नव्या फीचर मुळे व्हाट्सॅप यूजर्सना नवीन पर्याय "अॅडमिन किंवा एव्री मेंबर" मिळतो, या फीचर मध्ये अॅडमिन सिलेक्ट केल्यावर फक्त ग्रुप अॅडमिन डिस्क्रिप्शन मध्ये बदल करू शकतो तर एव्री मेंबर निवडल्यास कोणताही मेंबर डिस्क्रिप्शन एडिट करू शकतात. सध्या हा फीचर फक्त एंड्राइड बीटा यूजर्स साठी उपलब्ध आहे आणि इतर प्लॅटफॉर्म्स साठी नंतर येईल.
एंड्राइड बीटा वर आहे उपलब्ध
WABetaInfo कडून ही बातमी समोर आली आहे. ब्लॉग पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे की हा फीचर वापरण्यासाठी यूजर्सना आपला व्हाट्सॅप v2.18.132 बीटा वर अपडेट करावा लागेल. या फीचर ला रिस्ट्रिक्टेड ग्रुप फीचर नाव देण्यात आले आहे आणि ग्रुप अॅडमिन हा फीचर इन्फो ग्रुप मध्ये जाऊन ग्रुप सेटिंग निवडून एडिट ग्रुप इन्फो मध्ये जाऊन वापरू शकतात.
व्हाट्सॅप यूजर्स या फीचर मुळे निवडू शकतात की कोण ग्रुप चा सब्जेक्ट, आइकॉन आणि डिस्क्रिप्शन बदलू शकतो ते, यासाठी यूजर्सना दोन पर्याय मिळतील एक ऑल पार्टिसिपेंट आणि दुसरा ओनली अॅडमिन. नवीन ग्रुप सेटिंग सेक्शन मधून अॅडमिन नवीन ग्रुप अॅडमिन पण निवडू शकतात. आशा आहे की कंपनी लवकरच सर्व यूजर्स साठी हा अपडेट जारी करेल.