मोबाईल मेसेजिंग सर्विस व्हॉट्सअपने एक ब्लॉग जारी केला आहे. कंपनीने २०१६ च्या अखेरपर्यंत ब्लॅकबेरी ओएस (BB10) साठी आपला सपोर्ट देणे बंद करेल. ही बातमी ब्लॅकबेरीच्या यूजर्ससाठी आश्चर्याचा धक्का देणारी असू शकते, जे आपल्या फोनवर व्हॉट्सचा वापर करतात.
व्हॉट्सअपचा ब्लॅकबेरीवर आपले सपोर्ट देणे बंद करण्याचा अर्थ आहे की पुढील वर्षापासून ब्लॅकबेरी ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे स्मार्टफोन्स यूजर्स आपल्या हँडसेटमध्ये व्हॉट्सअप वापरु शकणार नाही आणि ह्यामुळे यूजर्ससाठी ही चिंताजनक बातमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्लॅकबेरीसह नोकियाची S40 सीरिज, नोकिया सिम्बियन S60, अॅनड्रॉईड 2.1, अॅनड्रॉईड 2.2 आणि विंडोज फोन 7.1 ओएसवर चालणा-या स्मार्टफोन्सवर आता व्हॉट्सअप चालणार नाही. ह्या सर्वा स्मार्टफोन्सवर पुढील वर्षापासून व्हॉट्सअप सेवा बंद होणार आहे.
व्हॉट्सअपने आपल्या ब्लॉगवर असे सांगितले आहे की, “जर आपल्याजवळही ह्या प्लेटफॉर्मवर चालणारे स्मार्टफोन असतील तर व्हॉट्सअप वापरण्यासाठी २०१६ च्या शेवटपर्यंत ह्याला अॅनड्रॉईड, आयफोन आणि विंडोज फोन्सने अपग्रेड करण्याची जरुरत आहे.”व्हॉट्सअपचे म्हणणे आहे की, तो फक्त त्याच प्लेटफॉर्मवर लक्ष देईल ज्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
हेदेखील वाचा – आता फ्रीडम 251 स्मार्टफोनवर उपलब्ध होणार ‘कॅश ऑन डिलिवरी’ सुविधा
हेदेखील वाचा – २२ मार्चला लाँच होणार अॅप्पल आयफोन 5Se ?