व्हाट्सॅप ने iOS 10 आणि त्याखालील वर्जन वर चालणार्या डिवाइस साठी यूट्यूब सपोर्ट डिसेबल केला आहे, म्हणजे आता इन-चॅट यूट्यूब फीचर आता फक्त iOS 11 यूजर्स साठी उपलब्ध होईल. आधी हा फीचर सर्व iOS यूजर्स साठी जारी केला होता पण आता काही कारणास्तव कंपनी ने iOS 10 आणि त्याखालील वर्जन साठी हा फीचर डिसेबल केला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये व्हाट्सॅप ने Apple iPhone यूजर्स साठी हा फीचर जारी केला होता, ज्यामुळे यूजर्स डायरेक्ट अॅप मधून यूट्यूब विडियो बघू शकतील. 2018 च्या सुरवातीला कंपनी ने यूजर एक्सपीरियंस वाढवण्यासाठी पिक्चर-इन-पिक्चर सपोर्ट पण सामिल केला होता.
WABetaInfo ने ट्विटर वरून दिली माहिती
व्हाट्सॅप वॉचर WABetaInfo ने ट्विटर वर लिहिले, “व्हाट्सॅप ने iOS 10 आणि त्याखालील वर्जन साठी यूट्यूब ला रिमोटली डिसेबल केले आहे. हा फीचर आता खासकरून iOS 11 साठी उपलब्ध होईल. पण ट्वीट मधून अशी कोणतीच माहिती मिळाली नाही की हा फीचर iOS 10 यूजर्स साठी का डिसेबल करण्यात आला आहे."
यूट्यूब इन व्हाट्सॅप
यूट्यूब इन व्हाट्सॅप फीचर मधून iOS यूजर्स यूट्यूब विडियो व्हाट्सॅप अॅप मध्येच बघू शकत होते. उदाहरणार्थ, जर कोणी तुम्हाला यूट्यूब लिंक पाठवली आणि तुम्ही त्या लिंक वर क्लिक केली तर तो विडियो व्हाट्सॅप मध्ये ओपन होईल, यूट्यूब अॅप वर रीडायरेक्ट होण्या ऐवजी. एंड्राइड डिवाइस वरील व्हाट्सॅप वर कोणत्याही यूट्यूब लिंक वर क्लिक केल्यावर ती यूट्यूब अॅप वर रीडायरेक्ट होते.
PiP फीचर
याव्यतिरिक्त, व्हाट्सॅप ने यूट्यूब इन व्हाट्सॅप मध्ये यूजर एक्सपीरियंस चांगला करण्यासाठी PiP फीचर जारी केला आहे. PiP फीचर मुळे यूजर्स विडियो मिनीमाइज करून व्हाट्सॅप वर चॅट पण करू शकतात आणि सोबतच PiP मॉड मधून यूजर्स चॅट दरम्यान स्विच पण करू शकतात.