digit zero1 awards

Photography Tips: जाणून घ्या काय आहे OIS? तुमच्या फोटोग्राफीला आकर्षक बनवण्यासाठी Important। Tech News

Photography Tips: जाणून घ्या काय आहे OIS? तुमच्या फोटोग्राफीला आकर्षक बनवण्यासाठी Important। Tech News
HIGHLIGHTS

ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन म्हणजे काय?

OISसह फोटोग्राफी कशी आकर्षक होते?

OIS सह हात हलत असताना देखील स्पष्ट फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यात मदत करते.

एखादा नवा फोन खरेदी करायचा असेल, तर सर्वप्रथम आपण फोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स बघतो. आजकाल नव्या नव्या कॅमेरा टेक्नॉलॉजीसह स्मार्टफोन्स मार्केटमध्ये येत आहेत. बरेचदा असे होते की, ग्राहक नव्या टेक्नॉलॉजीसह नवीन ऐकून लोक गोंधळून जातात. जसे की, मेगापिक्सेल, सेन्सर, शटर स्पीड, वाइड अँगल, मॅक्रो, नाईट मोड स्लो मोशन, ड्युअल व्ह्यू इ. पण लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये काळात जर कोणता शब्द सर्वात जास्त ऐकला जात असेल तर तो आहे OIS आणि इमेज स्टॅबिलायझेशन. पण तुम्हाला माहित आहे का OIS म्हणजे काय? नाही ना. काळजी करू नका आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देऊ. 

OIS म्हणजे काय? 

OIS म्हणजे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन होय. हे कॅमेर्‍याचे हार्डवेअर आधारित तंत्रज्ञान आहे, जे नको असेल तेव्हा कॅमेरा शारीरिकरित्या हलवून हालचाली समायोजित करण्यास मदत करते. होय! OIS मध्ये, कॅमेऱ्याचे असे कार्य आहे की तो कोणताही धक्का बसला तरी तो फोनची हालचाल समायोजित करतो.

photography

फोटोग्राफी करताना, इमेज खराब होईल म्हणून हात किंचितही हलवता येत नाही. फोन हातात धरून फोटो क्लिक केले जातात, तिथे ही तक्रार सर्वाधिक आहे. ट्रायपॉडच्या तुलनेत हात अधिक हलतो. रात्री किंवा झूम वापरताना ही समस्या वाढते. अशात, OIS हे एक टेक्नॉलॉजी आहे, जी हात हलत असताना देखील स्पष्ट फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यात मदत करते. म्हणजेच यासह स्टॅबिलायजेशन राखले जाते.

OISसह फोटोग्राफी कशी आकर्षक होते? 

रात्रीच्या वेळी तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळेल. कॅमेरा प्रकाशापासून फोटो घेतो हे तुम्हाला माहिती आहेच. रात्रीच्या वेळी प्रकाश कमी असतो आणि चित्र क्लिक करताना प्रकाश पकडण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि त्या वेळी हात थरथरतो. अशा परिस्थितीत, OIS हाताची ही हालचाल समायोजित करून चांगले परिणाम देण्यास मदत करते.

OIS मध्ये एक लहान जायरोस्कोप असतो, जो हाताची हालचाल ओळखतो आणि कॅमेरा विरुद्ध दिशेने हलवतो. यात एक अ‍ॅक्ट्युएटर म्हणजेच मोटर आहे, जी रिअल टाइममध्ये हाताची हालचाल ओळखते आणि त्यानुसार कॅमेरा समायोजित करते. अशाप्रकारे OIS तुमच्या प्रतिमा आणि व्हिडिओ बर्‍यापैकी स्थिर बनवते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo