टेलिकॉम दिग्गज Vodafone Idea कंपनीने आपल्या यूजर्ससाठी अनेक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. हे प्लॅन प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी ऑफर केले जातात. हे प्लॅन्स विशेषतः ICC मेन्स T20 क्रिकेट विश्वचषक आणि UEFA युरो 2024 साठी आणले गेले आहेत. या प्लॅन्ससह क्रिकेट आणि फुटबॉल प्रेमींना सामने पाहण्यासाठी वेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार नाही. हे प्लॅन्स Disney+ Hotstar आणि SonyLIV सबस्क्रिप्शनसह येतात. जाणून घ्या Vodafone Idea चे नवे प्लॅन्स-
Vodafone Idea ने प्रीपेड यूजर्ससाठी तीन नवीन प्लॅन्स लाँच केले आहेत. या नव्या प्लॅन्सची किंमत 82 रुपये, 169 रुपये आणि 903 रुपये आहे.
82 रुपयांचा प्लॅन: Vodafone Idea चा स्वस्त रिचार्ज प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 28 दिवसांपर्यंत SonyLIV प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय, या प्लॅनमध्ये 4GB डेटाची सुविधाही उपलब्ध आहे.
169 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन एका महिन्याच्या म्हणजेच 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये 8GB डेटा देखील देण्यात आला आहे. हा प्लॅन Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनसह येतो, जो 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे.
903 रुपयांचा प्लॅन: हा प्लॅन संपूर्ण तीन महिने म्हणजेच 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचाही समावेश आहे. VI चा हा प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह SonyLIV प्रीमियम मोबाईलचे सबस्क्रिप्शन देखील प्रदान करतो.
Vodafone Idea पोस्टपेड यूजर्ससाठी दोन प्लॅन्स सादर करण्यात आले आहेत. यामध्ये 100 आणि 499 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.
100 रुपयांचा प्लॅन: या प्लानमध्ये 10GB डेटा दिला जात आहे. यासोबतच हा प्लान SonyLIV Premium (TV+Mobile) सबस्क्रिप्शन देखील देतो.
499 रुपयांचा प्लॅन: 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 20GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन 1 वर्षापर्यंत मिळेल.