Vivo ने त्यांची Z-series यावर्षी जुलै मध्ये लॉन्च केली होती. या सीरीज मध्ये पहिला स्मार्टफोन म्हणून कंपनीने Vivo Z1 Pro लॉन्च केला होता. या मोबाईल फोनची किंमत Rs 14,990 होती. विशेष म्हणजे या किंमतीत हा एक अफोर्डेबल आणि बेस्ट मोबाईल फोन आहे. पण आपल्या Z सीरीज मध्ये काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला एक नवीन मोबाईल फोन म्हणजे Vivo Z1X लॉन्च केला आहे.
या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 48MP चा कॅमेरा मिळतो, जो यांना एकमेकांपासून वेगळा करतो. बाजारात असे अनेक स्मार्टफोन्स आहेत जे या कॅमेऱ्यासह येतात, पण यात तुम्हाला एक 32MP चा पण सेंसर मिळतो, जो याला एका चांगल्या कॅमेरा फोनच्या श्रेणीत नेतो. तसेच या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक सुपर AMOLED स्क्रीन पण मिळतो. चला आज आपण एकाच कंपनीच्या या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये किंमत, स्पेक्स आणि फीचर्सची तुलना करणार आहोत, आणि जाणून घेणार आहोत कि यांच्यात किती साम्य आहे किंवा किती फरक आहे.
Vivo Z1x ची बेस शुरुआती किंमत Rs 16,990 आहे आणि या वेरीएंट मध्ये 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते, तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरीएंट Rs 18,990 मध्ये सादर केला गेला आहे. डिवाइसचा 8GB रॅम लॉन्च केला गेला नाही. स्मार्टफोन फ्यूजन ब्लू आणि फँटम पर्पल कलर मध्ये लॉन्च होईल. तसेच Realme XT स्मार्टफोनची भारतात बेस किंमत Rs 15,999 आहे, हि किंमत या मोबाईल फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरीएंटची आहे.
तसेच Vivo Z1 Pro च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरीएंटची किंमत 14,990 रुपये ठेवण्यात आली आहे तर 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरीएंट 16,990 रुपयांमध्ये आला आहे. तसेच टॉप वेरीएंट बद्दल बोलायचे तर यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते आणि याची किंमत 17,990 रुपये ठेवण्यात आली आहे.
डुअल-सिम Vivo Z1x 6.38 इंचाच्या फुल HD+ डिस्प्ले सह आला आहे आणि याचे रेजोल्यूशन 1080×2 340 पिक्सल आहे. हा सुपर AMOLED डिस्प्ले आहे ज्याच्या टॉपला एक वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे आणि स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 712 SoC द्वारा संचालित आहे जो 6GB रॅम सह पेयर केला गेला आहे. कंपनीने मल्टी-टर्बो आणि अल्ट्रा गेम मोड पण देण्यात आला आहे ज्यामुळे परफॉरमेंस मध्ये सुधार केला जाऊ शकतो. Vivo Z1x मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो ज्यात एक 48 मेगापिक्लचा Sony IMX582 सेंसर आहे आणि याचा अपर्चर f/1.79 आहे, दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्लची 120 डिग्री वाइड एंगल लेंस आहे आणि याचे अपर्चर f/2.2 आहे तर तिसरा 2 मेगापिक्लचा पोर्ट्रेट कॅमेरा आहे आणि याचे अपर्चर f/2.4 आहे. सेल्फी साठी स्मार्टफोन मध्ये 32 मेगापिक्लचा कॅमेरा देण्यात आला आहे आणि ज्याचे अपर्चर f/2.0 आहे.
Vivo Z1x मध्ये 64GB आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज मिळते, पण स्टोरेज वाढवता येत नाही. कनेक्टिविटी साठी 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, GPS/ A-GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे. फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 22.5W फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
जर विवो Z1 प्रो च्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 712 ओक्टा-कोर प्रोसेसर मिळतो आणि हा तीन वेरीएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे, सोबतच डिवाइसची स्टोरेज वाढवण्यासाठी माइक्रो SD कार्डचा पर्याय पण मिळतो. गेमिंग एक्सपीरियंस चांगला करण्यासाठी स्मार्टफोन मध्ये एड्रेनो 616 GPU आहे.
Vivo Z1 Pro स्नॅपड्रॅगॉन X15 मॉडेम सह सादर केला गेला आहे जो 800Mbps डाउनलोड स्पीडला सपोर्ट करतो, लक्षात असू दे कि या स्पीडचे कनेक्शन इन्टरनेट स्पीडशी नाही हे फक्त चांगल्या कनेक्टीविटी साठी आहे.
Vivo Z1 Pro एंड्राइड 9 पाई वर आधारित फनटच OS 9 सह आला आहे आणि फोन मध्ये 6.53 इंचाचा फुल HD प्लस डिस्प्ले मिळतो. ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर डिवाइस मध्ये तीन बॅक कॅमेरा देण्यात आले आहेत ज्यात एक 16 मेगापिक्लचा कॅमेरा आहे, दुसरा 8 मेगापिक्लचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे आणि तिसरी 2 मेगापिक्लची लेंस आहे. Vivo Z1 Pro मध्ये सेल्फी साठी 32 मेगापिक्लचा फ्रंट कॅमेरा मिळतो. स्मार्टफोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.