Vivo Y95 ने भारतात केली शानदार एंट्री, ही आहे स्मार्टफोनची किंमत

Updated on 26-Nov-2018
HIGHLIGHTS

नुकताच वीवो ने Y95 भरतात लॉन्च केला आहे. याच्या खास फीचर्स मुळे हा स्मार्टफोन कंपनीची शानदार पेशकश आहे. लॉन्च सोबत भारतीय बाजारातील याच्या किंमतीचा पण खुलासा झाला आहे.

रविवारी Vivo ने Y-series चा एक नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. लॉन्च मध्ये Y95 स्मार्टफोनची किंमत भारतीय बाजारात 16,990 रूपए ठेवली आहे. त्यामुळे हा डिवाइस एक मिड-रेंज स्मार्टफोन च्या कॅटेगरी मध्ये येतो. तुम्हाला सांगू इच्छितो की हा फोन Vivo Y93 चाच अपग्रेड वर्जन आहे जो रीवॅम्प्ड डिजाइन सह काही अपग्रेडेड इंटरनल्स सह लॉन्च केला गेला आहे. लुक्स पाहता हा मोबाईल फोन दिसायला नुकत्याच लॉन्च झालेल्या V9 Pro प्रमाणे दिसतो ज्यात की एक छोटी वॉटर ड्रॉप नॉच डिवाइसच्या समोरच्या बाजूला देण्यात आलेली आहे ज्याला वीवो आपल्या भाषेत Halo FullView डिस्प्लेचे नाव दिले आहे.

Vivo Y95 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

हा वीवो चा असा पहिला स्मार्टफोन आहे जो वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले सह येतो. या नॉच सह Vivo Y95 AI आधारित 20MP सेल्फी कॅमेर्‍यासह येतो. कंपनीचा असा दावा आहे की हा त्यांचा आता पर्यंतचा सर्वात अडवान्स फोन आहे जो फेशियल डिटेल्स इतक्या बारकाईने कॅप्चर करतो की यूजरचे वय, लिंग, स्किन टोन, टेक्सचर ची पण माहिती मिळते. 

 

हा स्मार्टफोन लाइटिंग एनवायरमेंट पण ऑटोमेटिकली सहज डिटेक्ट करू शकतो ज्यामुळे फेशियल डिटेल्स हाई लाइट करता येतात. हा स्मार्ट डिवाइस 1520x 720pixel रेसोल्यूशन सह 6.22-inch HD+ Halo FullView मध्ये येतो. भारतात हा स्मार्टफोन Starry Black आणि Nebula Purple कलर वेरिएंट्स मध्ये उपलब्ध आहे. 

जास्तीत जास्त वीवो फोन्स कॅमेरा फोकस्ड असतात आणि नवीन Vivo Y95 पण त्यातलाच एक आहे. हा स्मार्टफोन रियर पॅनल वर ड्यूल कॅमेरा सेट-अप सह येतो. याच्या बॅक पॅनल वर 13MP चा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे आणि सोबतच डेप्थ सेंसिंग साठी 2MP चा सेंसर देण्यात आला आहे. कंपनी असा पण दावा करते कि Y95 प्रोफेशनल ग्रेड पोर्ट्रेट शॉट्स पण कॅप्चर करू शकतो. हा 20MP face beauty, portrait mode, panorama, AR stickers सारख्या फीचर्स सह येतो. 
साध्य तरी हा मोबाईल फोन फक्त 4GB RAM सह 64GB इंटरनल स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जी microSD ने 256GB पर्यंत वाढवता येते. हा डिवाइस Qualcomm Snapdragon 439 वर चालतो आणि यात 4030mAh बॅटरी देण्यात आली आहे. सॉफ्टवेयर बद्दल बोलायाचे तर हा V9 Pro Android 8.1 Oreo वर आधारित Funtouch OS 4.5 वर चालतो. 

लॉन्च ऑफर्स आणि Vivo Y95 ची उपलब्धता

Vivo Y95 ऑफलाइन पार्टनर आउटलेट्स वर आणि Vivo India estore वर उपलब्ध केला जाईल. ऑनलाइन आणि ऑफलाइन विकत घेतल्यास या स्मार्टफोन सोबत यूजर्सना अनेक ऑफर्स मिळू शकतात. यात No Cost EMI (क्रेडिट, डेबिट आणि Bajaj Finance EMI कार्ड्स वर 15 महिन्यांपर्यंत) ची ऑफर आहे. तसेच लोवेस्ट EMI 1133 रुपयांपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर यूजर्सना 1500 रुपयांची कॅशबॅक ऑफर आणि Reliance Jio कडून 3 TB पर्यंतचा डेटा 4,000 रुपयांचे बेनिफिट्स सह दिला जात आहे. 
 

 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :