Vivo Y93 चा 3GB रॅम वेरिएंट भारतात झाला लॉन्च, किंमत Rs 12,990
Vivo Y93 काही दिवसांपूर्वी भारतात लॉन्च केला गेला होता आणि आता या स्मार्टफोनचा 3GB रॅम वेरिएंट भारतात लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत Rs 12,990 ठेवण्यात आली आहे.
Vivo ने काही दिवसांपूर्वी भारतात आपल्या Y सीरीजचा Vivo Y93 स्मार्टफोन 4GB रॅम सह Rs 13,990 मध्ये लॉन्च केला होता. आता कंपनीने या स्मार्टफोनचा अजून एक वेरिएंट 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह Rs 12,990 मध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन चीन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 SoC सह लॉन्च केला गेला होता आणि त्यानंतर भारतात हा डिवाइस मीडियाटेक हीलियो P22 प्रोसेसर सह सादर केला गेला.
Vivo Y93 विवो इंडियाच्या अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन रिटेल चॅनेल वर उपलब्ध होईल आणि हा स्टारी नाईट आणि नेबुला पर्पल रंगात विकत घेता येईल.
Vivo Y93 स्पेसिफिकेशंस
जर या मोबाईल फोनच्या डिस्प्ले इत्यादी बद्दल बोलायचे तर हा मोबाईल फोन चीन नंतर भारतात लॉन्च केला गेला आणि याच्या फीचर्स मध्ये जास्त काही फरक तुम्हाला दिसणार नाही. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 6.2-इंचाचा HD+ 720×1580 पिक्सल असलेला एक Halo FullView डिस्प्ले मिळत आहे, जो 19:9 आस्पेक्ट रेश्यो सह येतो.
जर फोन मध्ये म्हणजे Vivo Y93 मधील इतर काही फीचर्स आणि स्पेक्स बद्दल बोलायचे तर विवो वाई 93 मोबाईल फोन एका ओक्टा-कोर मीडियाटेक Helio P22 चिपसेट सह लॉन्च केला गेला आहे, पण चीन मध्ये हा मोबाईल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 सह लॉन्च केला गेला आहे. फोन एंड्राइड 8.1 Oreo वर चालतो आणि यात तुम्हाला ड्यूल सिम सपोर्ट पण मिळत आहे.
जर Vivo Y93 मोबाईल फोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचे तर हा फोन एका ड्यूल कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला गेला आहे, या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक ड्यूल रियर कॅमेरा मिळत आहे. हा एक 13MP आणि 2MP चा कॅमेरा कॉम्बो आहे. तसेच फोन मध्ये एक 8MP चा फ्रंट कॅमेरा सेटअप पण देण्यात आला आहे. तसेच या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 4,030mAh क्षमता असलेली बॅटरी पण मिळत आहे.