4,030 MAH बॅटरी सह VIVO Y90 झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत
MediaTek Helio A22 SoC सह येतो हा फोन
Black आणि Gold रंगात लॉन्च झाला Vivo Y90
3.5mm ऑडियो जॅक पण आहे यात
Vivo Y90 पाकिस्तान मध्ये लॉन्च केल्यानंतर अधिकृतपणे सादर करण्यात आला आहे. Vivo Y-series च्या या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला वॉटर ड्रॉप नॉच स्टाइल मिळते. सोबतच यात तुम्हाला सिंगल रियर कॅमेरा पण देण्यात आला आहे. सोबतच फोनचा बॅक पॅनल मॅट सारखा देतो. वीवोचा हा लेटेस्ट फोन Vivo Y90 लवकरच भारतात पण येण्याची शक्यता आहे. तसेच भारतात हा Rs. 6,990 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. पाकिस्तान मध्ये हा फोन दोन कलर ऑप्शंस मध्ये लॉन्च केला गेला आहे.
VIVO Y90 ची किंमत
वीवो Y90 ची किंमत पाहता याची किंमत 18,999 पाकिस्तानी रुपये म्हणजे जवळपास 8,100 रुपये आहे. फोन ब्लॅक आणि गोल्ड रंगात सादर केला गेला आहे. रिपोर्ट्स नुसार लवकरच हा फोन भारतीय मार्केट मध्ये पण जवळपास 6,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.
VIVO Y90 स्पेसिफिकेशन
ड्यूल सिम सह Vivo Y90 मध्ये तुम्हाला 6.22 इंचाचा एचडी+ (720×1520 पिक्सल) मल्टी-टच डिस्प्ले मिळतो. हा फोन हीलियो ए22 प्रोसेसर सह 2 जीबी रॅम मध्ये येतो. यात तुम्हाला 4,030 एमएएच ची बॅटरी मिळते. फोन एंड्रॉयड 8.1 ओरियो वर आधारित फनटच ओएस 4.5 वर रन चालतो. याची इनबिल्ट स्टोरेज 32 जीबी आहे जी 512 जीबी पर्यंत माइक्रोएसडी कार्डचा वापर करून वाढवता येते.
ऑप्टिक्स मध्ये वीवो वाई90 मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. सेल्फी साठी फ्रंट पॅनल वर एफ/ 1.8 अपर्चर वाला 5 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. फेस ब्यूटी, प्रोफेशनल, पाम कॅप्चर, वॉयस कंट्रोल, फ्लॅश, वीडियो, टाइम-लॅप्स, स्लो, टाइम वाटरमार्क आणि मॉडेल वाटरमार्क फीचर्स रियर कॅमेऱ्याचा भाग आहेत. फ्रंट कॅमेरा फेस ब्यूटी, पाम कॅप्चार, वॉयस कंट्रोल, सेल्फी लाइटिंग, वीडियो आणि टाइम वाटरमार्क फीचर सह येतो.
कनेक्टिविटी साठी वाई-फाई, ब्लूटूथ 5, माइक्रो-यूएसबी पोर्ट, जीपीएस, यूएसबी ओटीजी आणि 3.5 एमएम ऑडियो जॅकचा समावेश आहे.