ओप्पोचा लेटेस्ट स्मार्टफोन Oppo R17 Pro आज भारतात लॉन्च होत आहे. हा लॉन्च इवेंट मुंबई मध्ये संध्याकाळी 7 वाजता होईल. यासाठी चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ने मीडिया इन्वाइट्स पण पाठवले आहेत. लॉन्च इवेंट मध्ये फक्त Oppo R17 Pro लॉन्च होण्याची बातमी आहे. Oppo R17 भारतात लॉन्च केला जाणार नाही. त्यामुळे स्मार्टफोन Oppo R17 Pro हा भारताचा पहिला असा स्मार्टफोन असेल जो Oppo के Super VOOC फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह येईल. या फोन मध्ये 8GB RAM, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि वॉटर ड्रॉप नॉच असण्याची शक्यता आहे.
या स्मार्टफोनची किंमत पाहता चीन मध्ये झालेल्या लॉन्च मध्ये 6GB RAM/ 128GB स्टोरेज वेरीएंट साठी याची किंमत CNY 3,999 म्हणजे जवळपास 40,800 रुपये होती आणि 8GB RAM/ 128GB स्टोरेज वेरीएंट साठी याची किंमत CNY 4,299 म्हणजे जवळपास 43,900 रुपये आहे.
Oppo R17 Pro च्या लॉन्चची लाइव स्ट्रीमिंग बघण्यासाठी युजर्स कंपनीच्या Facebook आणि Twitter वर सांध्याकाळी 7 IST जाऊ शकतात आणि सर्व माहिती घेऊ शकतात.
Oppo R17 Pro मध्ये युजर्सना 6.4-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले 2340×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह मिळत आहे. त्याचबरोबर तुम्हाला यात 19:9 आस्पेक्ट रेश्यो आणि एक वाटर ड्राप नॉच पण मिळते. डिस्प्लेला गोरिला ग्लास 6 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. तसेच यात तुम्हाला एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण मिळत आहे.
ग्रेडिएंट डिजाईन बॅक सह Oppo R17 Pro मोबाईल फोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 प्रोसेसर मिळत आहे. हा 8GB रॅम आणि 128GB च्या स्टोरेज सह घेता येतो. हा एंड्राइड 8.1 Oreo वर चालतो. मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक TOF 3D सेंसिंग टेक्नोलॉजी पण मिळत आहे. Oppo R17 Pro मोबाईल फोन मध्ये एक 3D फेशियल रिकग्निशन मिळत आहे.
डिवाइसच्या कॅमेरा मध्ये तुम्हाला एक 12MP का रियर कॅमेरा मिळत आहे. त्याचबरोबर एक 20MP चा सेकेंडरी कॅमेरा पण आहे जो तुमाला पोर्ट्रेट शॉट घेण्यास मदत करतो. Oppo R17 Pro मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 3,700mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे, हि बॅटरी Super VOOC फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते.