Price cut! 50MP कॅमेरासह येणाऱ्या Vivo Y58 5G च्या किमतीत घट, जाणून घ्या नवी किंमत

Price cut! 50MP कॅमेरासह येणाऱ्या Vivo Y58 5G च्या किमतीत घट, जाणून घ्या नवी किंमत
HIGHLIGHTS

Vivo Y58 5G फोन जूनमध्ये भारतात सादर करण्यात आला होता.

Vivo च्या लेटेस्ट Vivo Y58 5G स्मार्टफोनच्या किमतीत कपात

Vivo Y58 5G वर 1000 रूपयांची कपात आणि 1000 रूपयांची सवलत उपलब्ध आहे.

तुम्हाला नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करायचा आहे? तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लेटेस्ट Vivo Y58 5G च्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. Vivo Y58 5G फोन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हे उपकरण कंपनीने अलिकडेच जून महिन्यात लाँच केले होते. दरम्यान, आता या हा स्मार्टफोन तुम्हाला 2,000 रुपयांनी स्वस्त मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात Vivo Y58 5G ची नवी किंमत आणि इत्र तपशील-

Vivo Y58 5G च्या किमतीत घट

Vivo Y58 5G फोन भारतीय बाजारात 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला होता. लाँचच्या वेळी हा फोन 19,499 रुपयांना सादर करण्यात आला होता. मात्र, वर सांगिल्याप्रमाणे, या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. या फोनच्या किमतीत 1000 रुपयांची कपात केली गेली आहे.

Vivo Y58 5G

या कपातीनंतर Vivo Y58 5G फोनची किंमत 18,499 रुपये इतकी होईल. तसेच, या फोनवर बँक डिस्काउंटसह देखील 1000 रूपयांची सूट उपलब्ध आहे. अशाप्रकारे, हा फोन तुम्ही आता 17,499 रुपयांना खरेदी करू शकता. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन तुम्ही कंपनीच्या वेबसाइट, रिटेल स्टोअर आणि Amazon प्लॅटफॉर्मवरून डिव्हाइस खरेदी करू शकता.

Vivo Y58 5G चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y58 5G मध्ये, वापरकर्त्यांना मोठा 6.72 इंच लांबीचा FHD + HD LCD डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे, ज्याचे रिफ्रेश रेत 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट उपलब्ध आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, डिव्हाइसमध्ये 8GB RAM + 128GB अंतर्गत स्टोरेज आणि 8GB विस्तारित रॅमसाठी समर्थन आहे. यासह तुम्हाला फोनमध्ये एकूण 16GB पर्यंत रॅम मिळेल.

याव्यतिरिक्त, Vivo Y58 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्राइमरी आणि 2 मेगापिक्सेल सेकंडरी लेन्स आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, यासह 44W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान सपोर्ट मिळेल. इतर फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, Wi-Fi, ब्लूटूथ, ड्युअल सिम, 4G, 5G, स्टिरिओ स्पीकर आणि IP64 रेटिंग आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo