नवा Affordable स्मार्टफोन Vivo Y58 5G भारतात लाँच, मोठ्या बॅटरीसह मिळतील अप्रतिम फिचर्स। Tech News 

नवा Affordable स्मार्टफोन Vivo Y58 5G भारतात लाँच, मोठ्या बॅटरीसह मिळतील अप्रतिम फिचर्स। Tech News 
HIGHLIGHTS

नवीनतम Vivo Y58 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच

विशेष म्हणजे Vivo Y58 5G फोनमध्ये आकर्षक रिंग डिझाइनसह कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Vivo Y58 5G फोन बजेट विभागात सादर करण्यात आला आहे.

Vivo Y58 5G: Vivo च्या Vivo Y58 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. अखेर Vivo Y58 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. Y-सिरीजमध्ये येणारा हा नवीन स्मार्टफोन बजेट विभागात येतो. विशेष म्हणजे आकर्षक रिंग डिझाइनसह कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Vivo च्या नवीन Vivo Y58 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Also Read: ड्युअल सेल्फी कॅमेरासह लेटेस्ट Xiaomi 14 Civi ची भारतात सेल सुरु, मिळेल भारी Discount। Tech News

Vivo Y58 5G ची भारतीय किंमत

स्मार्टफोन ब्रँड Vivo चा नवा Vivo Y58 5G स्मार्टफोन 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. नव्या Vivo स्मार्टफोनची किंमत 19,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा हँडसेट अधिकृत वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

Vivo Y58 5G launched in india
Vivo Y58 5G launched in india

Vivo Y58 5G चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y58 5G मध्ये 6.72 इंच लांबीचा LCD HD Plus डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये व्हर्च्युअल रॅम आणि मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येईल. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देखील देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, हा फोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल.

फोटोग्राफीसाठी या हँडसेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP लेन्स आणि 2MP सेकंडरी सेन्सर मिळेल. त्याबरोबरच, यात आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 6,000mAh जंबो बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंगसह समर्थित आहे. फोनमधील उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo