आगामी Vivo Y58 5G स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट Confirm! बजेट किमतीत मिळतील Powerful फीचर्स 

आगामी Vivo Y58 5G स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट Confirm! बजेट किमतीत मिळतील Powerful फीचर्स 
HIGHLIGHTS

Vivo कंपनीने Vivo Y58 5G ची भारतीय लाँच डेट कन्फर्म केली आहे.

Vivo चा हा स्मार्टफोन भारतात 20 जून 2024 रोजी लाँच होणार आहे.

vivo y58 5g हा कंपनीचा आगामी बजेट स्मार्टफोन असणार आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या Vivo Y58 5G फोनच्या भारतीय लाँचची चर्चा मागील काही काळापासून सुरु होती. अखेर आता कंपनीने Vivo Y58 5G ची भारतीय लाँच डेट कन्फर्म केली आहे. हा कंपनीचा आगामी बजेट स्मार्टफोन असणार आहे. हा स्मार्टफोन काही काळापासून लीकचा भाग होता. याद्वारे फोनचे अनेक फीचर्स लीकच्या माध्यमातून समोर आले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात Vivo Y58 5G ची लाँच डेट आणि इतर तपशील-

Also Read: AI फीचर्ससह सुसज्ज Motorola Edge 50 Pro वर मिळतोय बंपर Discount, बघा Best ऑफर

Vivo Y58 5G चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स

Vivo India ने अखेर Vivo Y58 5G स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म केली आहे. Vivo चा हा स्मार्टफोन भारतात 20 जून 2024 रोजी लाँच होणार आहे. लाँच डेटसोबतच कंपनीने फोनचा फर्स्ट ऑफिशियल लुक देखील उघड केला आहे. पोस्टरमध्ये दिसत आहे की, हा फोन सर्क्युलर कॅमेरा मॉड्यूलसह ​​येईल. एवढेच नाही तर, हा फोन ब्लू आणि ग्रीन या दोन कलर ऑप्शनसह सादर केला जाणार आहे.

Vivo Y58 5G India launch confirmed on 20th June 2024
Vivo Y58 5G India launch confirmed on 20th June 2024

Vivo Y58 5G चे लीक तपशील

वर सांगितल्याप्रमाणे, Vivo Y58 5G बद्दल अनेक लीक्स पुढे आले आहेत. लीकनुसार, हा स्मार्टफोन 6.72 इंच लांबीच्या फुल-HD+ डिस्प्लेसह दाखल होईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट मिळेल. तर, फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल आणि हा फोन 8GB व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह असू शकतो.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी कॅमेरा मिळेल. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची बॅटरी 6000mAh असेल, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट असण्याची अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo