नव्या रंगरूपात Affordable फोन Vivo Y56 5G भारतात Launch, किमंत केवळ 16,999 रुपये। Tech News
Vivo Y56 5G स्मार्टफोन नव्या व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच
Vivo Y56 5G च्या नव्या म्हणजे 4GB रॅमसह 128GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये
फोनच्या दोन्ही वेरिएंटमध्ये मायक्रो SD कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज वाढवता येऊ शकते.
Vivo ने 2023 च्या सुरुवातीच्या महिन्यात भारतात आपला मिडरेंज 5G फोन Y56 लाँच केला. त्यावेळी, हा मोबाईल 8GB रॅमसह लाँच केला गेला होता, ज्याची किंमत 19,999 रुपये होती. त्यानंतर, आता कंपनीने Vivo Y56 5G चे परवडणारे वेरिएंट देखील भारतात लाँच केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन मॉडेलमध्ये 4GB रॅमसह 128GB इंटर्नल स्टोरेज मिळणार आहे. चला बघुयात किंमत आणि सर्व तपशील.
Vivo Y56 5G च्या नव्या व्हेरिएंटची प्राईस
नव्या व्हेरिएंटसह हा फोन आता एकूण दोन व्हेरिएंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. Vivo Y56 5G च्या नव्या म्हणजे 4GB रॅमसह 128GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर, फोनच्या 8GB रॅमसह 128GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये इतकी आहे. सर्वप्रथम, आम्ही तुम्हाला सांगतो की हा मोबाइल 8GB वाढवता येण्याजोग्या रॅमला सपोर्ट करतो. यासह फोन 16GB रॅमवर गरजेनुसार परफॉर्म करू शकतो.
Vivo Y56 5G च्या दोन्ही वेरिएंटमध्ये मायक्रो SD कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज वाढवता येऊ शकते. हा फोन ब्लॅक इंजिन आणि ऑरेंज शिमर कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Vivo Y56 5G
फोनमध्ये 2408 × 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.58 इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आहे. जो वॉटरड्रॉप नॉच स्टाईलवर बनविला गेला आहे आणि 60Hz रिफ्रेश रेट आहे. प्रोसेसिंगसाठी यात MediaTek Dimensity 700 octa-core प्रोसेसर देण्यात आला आहे. यासह तुमच्या फोनची बॅटरी लाईफ उत्तम राहील आणि आणि तुम्ही नेहमी फोनशी कनेक्ट राहाल, याची खात्री देईल. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर F/1.8 अपर्चरसह 50MP चा प्रायमरी सेन्सर आणि F/2.4 अपर्चरसह 2MP चा सेकंडरी लेन्स दिला जातो. यासह तुम्ही ट्रू-टू -लाईफ इमेजेस कॅप्चर करू शकता. फ्रंट पॅनलवर F/2.0 अपर्चरसह 16MP सेल्फी सेन्सर आहे. तुम्ही सेल्फीचे शौकीन असाल तर, हा फ्रंट कॅमेरा तुमच्यासाठी बेस्ट आहे. तसेच, फोनमध्ये 5,000 mAh बॅटरीला आहे, जी 18W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. कनेक्टिव्हिटीमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, ब्लूटूथ, GPS आणि USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile