Vivo चे बजेट रेंज स्मार्टफोन भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. कंपनीने आपल्या दोन बजेट स्मार्टफोन Vivo Y56 5G आणि Vivo T2 5G च्या किमतीत कपात केली आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे. Vivo चे हे दोन्ही फोन याच वर्षी लाँच करण्यात आले आहेत. तर, या दोन्ही फोनचा लुक आणि डिझाइन जवळपास समान आहे. चला तर मग जाणून घेऊयात Vivo च्या या दोन्ही स्मार्टफोन्सची नवीन किंमत-
हे सुद्धा वाचा: Best Offer! iQOO 12 5G चे प्री-बुकिंग आजपासून होणार सुरू, Vivo चे कूल इयरबड्स मिळतील Free
Vivo T2 5G स्मार्टफोन 6GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 128GB या दोन व्हेरिएंटसह उपलब्ध आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये होती, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये होती. कंपनीने या दोन्ही व्हेरियंटच्या किंमती 1,000 रुपयांनी कमी केल्या आहेत. आता हा फोन अनुक्रमे 16,999 आणि 18,999 रुपयांना उपलब्ध होईल. या फोनच्या खरेदीवर 1500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही दिला जात आहे.
Vivo Y56 5G स्मार्टफोन 4GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 128GB या व्हेरिएंटसह उपलब्ध आहे. या दोन व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 16,999 रुपये आणि 18,999 रुपये होती. आता कपातीनंतर, या दोन व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आणि 17,999 रुपये झाली आहे. या फोनच्या किमतीत 1000 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर 1,000 रुपयांचा कॅशबॅकही दिला जात आहे.
Vivo T2 5G फोनमध्ये 6.38 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर उपलब्ध आहे. हा फोन 4,500mAh बॅटरीसह येतो. यात 64MP OIS मेन कॅमेरा आणि 2MP सेकंडरी कॅमेरा असेल. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा असेल.
Vivo Y56 5G मध्ये 6.58 इंच लांबीचा FHD+ LCD डिस्प्ले आहे. हे MediaTek Dimensity 700 5G प्रोसेसरसह येते. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 18W USB Type C चार्जिंग फीचर आहे. हे ड्युअल कॅमेरा सेटअपसह येते. यात 50MP प्राथमिक आणि 2MP सेकंडरी कॅमेरा असेल. तसेच, सेल्फीसाठी यात 16MP कॅमेरा असेल.