Vivo ने आपल्या Y सिरीजमधील नवीनतम स्मार्टफोन म्हणून Vivo Y55s 5G लाँच केला आहे. फोनमध्ये 6.55-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आहे, फोन 5G सपोर्टसह येईल. फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सेन्सर आहे. चला तर मग जाणून घेऊयात त्याची किंमत, उपलब्धता आणि इतर फीचर्सची संपूर्ण माहिती…
हे सुद्धा वाचा : iPhone युजर्ससाठी खुशखबर ! WhatsApp ने आणले अप्रतिम फिचर…
Vivo Y55s 5G मध्ये 6.55-इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले आहे. याचे फुल HD + रिझोल्यूशन 1080 x 2408 पिक्सेल आहे. रिफ्रेश दर 60Hz आहे. त्याची स्क्रीन टू बॉडी रेशो 90.6 टक्के आहे. प्रोसेसिंगसाठी यामध्ये डायमेन्सिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज पेअरिंग आहे. फोनमध्ये Android 12 आधारित FunTouch OS 12 दिसत आहे.
फोनच्या उजव्या बाजूला एक पॉवर बटण आहे, ज्याच्या वर फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ड्युअल-सिम, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, GPS, NFC, एक USB-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. डिव्हाइसला 18W जलद चार्जिंगसाठी समर्थनासह 5000mAh बॅटरीचे समर्थन आहे.
याव्यतिरिक्त, यात 50-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे, ज्यामध्ये 2-मेगापिक्सलचा पोर्ट्रेट शूटर देण्यात आला आहे. यासोबत LED फ्लॅशही आहे. मागील कॅमेरासह 60fps वर 1080p व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते. सेल्फीसाठी, समोर 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
Vivo Y55s 5G कंपनीने तैवान, हाँगकाँग सारख्या प्रदेशात लॉन्च केला आहे. फोन लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. फोन दोन रॅम, स्टोरेज कॉन्फिगरेशनसह येतो. याचे 4 GB RAM + 128 GB स्टोरेजचे प्रारंभिक मॉडेल आहे ज्याची किंमत NTD 7990 म्हणजेच सुमारे 21,000 रुपये आहे. त्याचा दुसरा व्हेरिएंट 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह येतो. त्याची किंमत NTD 8,490 म्हणजेच अंदाजे 22,500 रुपये आहे. हा फोन गॅलेक्सी ब्लू आणि स्टारलाईट ब्लॅक कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.