हा स्मार्टफोन 1.2GHz 64 बिट क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
मोबाईल निर्माता कंपनी विवोने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन विवो Y51L सादर केला आहे. कंपनीने भारतात ह्या स्मार्टफोनची किंमत ११,९८० रुपये ठेवली आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 540×960 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.2GHz 64 बिट क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
त्याचबरोबर विवो Y51L स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा एक ड्यूल सिम ड्युल स्टँडबाय डिवाइस आहे. हा कंपनीच्या फनटच ओएस 2.5 वर चालतो. जो अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉपवर आधारित आहे. ह्यात 2350mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी विवो Y51L स्मार्टफोनमध्ये भारतीय 4G LTE बँडसाठी सपोर्ट दिला आहे. हा GPS, वायफाय, ब्लूटुथ, USB OTG आणि मायक्रो-USB फीचर्सने सुसज्ज आहे. ह्यात नाइट मोड, HDR, पॅनोरमा आणि फेस ब्यूटीसारखे फीचर्ससुद्धा आहेत. रियर कॅमे-याने यूजर पुर्ण HD (1080 पिक्सेल) रिझोल्युशनचे व्हिडियो रेकॉर्ड करु शकाल. त्याचे परिमाण 143.8×71.7×7.52mm आणि वजन १५७ ग्रॅम आहे.