Vivo ने भारतात गुपचूप लाँच केला स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त ऑफर्स

Vivo ने गुपचूप आपला नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.
हा फोन कंपनीने Vivo Y39 5G नावाने सादर केला आहे.
Vivo Y39 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे.
प्रसिद्ध चिनी स्मार्टफोन ब्रँड Vivo ने गुपचूप आपला नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा फोन कंपनीने Vivo Y39 5G नावाने सादर केला आहे. हा फोन बजेट श्रेणीमध्ये लाँच करण्यात आला आहे. या किमतीत या फोनमध्ये प्रीमियम डिझाइन, पॉवरफुल बॅटरी, मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा आणि AI-पॉवर्ड स्मार्ट फीचर्स मिळतील. कंपनीने फोनच्या लाँचबद्दल अधिकृत X अकाउंटद्वारे माहिती दिली आहे. जाणून घेऊयात किंमत-
Also Read: Folax AI सारख्या फीचर्ससह Infinix Note 50x 5G फोन भारतात लाँच, किंमत 12,000 रुपयांपेक्षा कमी
Vivo Y39 5G ची किंमत
Vivo Y39 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. फोनचा 8GB+ 128GB व्हेरिएंट 16,999 रुपयांना आणि 8GB+ 256GB व्हेरिएंट 18,999 रुपयांना उपलब्ध असेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, आजपासून Amazon, Flipkart, vivo India e-Store आणि सर्व आघाडीच्या रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Looks that turn heads, battery that outlasts them all. The ultimate combo of style & power is here !
— vivo India (@Vivo_India) March 27, 2025
Presenting the vivo Y39 with the Segment’s biggest battery, because power should last as long as your Y’be.
Learn More https://t.co/t8PqK8BuwI#vivoY39 #ItsMyStyle #vivoYSeries pic.twitter.com/Y7MVMocnZs
यासह, फोनच्या खरेदीसह ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. वापरकर्ते 1500 रुपयांपर्यंतचा फ्लॅट कॅशबॅक मिळवू शकतात, जो 6 एप्रिल 2025 पर्यंत वैध असेल. स्टायलिश डिझाइन, स्मूथ परफॉर्मन्स, उत्कृष्ट कॅमेरा, शक्तिशाली बॅटरी आणि मजबूत टिकाऊपणा शोधणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हे डिव्हाइस एक उत्तम पर्याय आहे.
Vivo Y39 5G चे अपेक्षित स्पेक्स
Vivo Y39 5G फोनच्या अपेक्षित फीचर्स आणि स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, 6.68-इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेला सपोर्ट करतो, ज्यासह 120Hz चा रिफ्रेश रेट आहे. प्रोसेसिंगसाठी, हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी फोन ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करेल. त्याच्या मागील पॅनलमध्ये 50MP चा मुख्य सेन्सर असेल, जो 2MP च्या सेकंडरी सेन्सरसह कार्य करेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा असेल. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile