Vivo ने भारतात Y सीरीजचा नवा स्मार्टफोन Y36 लाँच केला आहे. हा Vivo स्मार्टफोन मागील वर्षी आलेल्या Vivo Y35 चे अपग्रेडेड मॉडेल आहे. कंपनीने त्याच्या डिझाइनपासून ते फीचर्समध्ये अपग्रेड केले आहे. मागील काही दिवसांपासून या फोनबद्दल बरेच लीक्स पुढे येत होते. आता अखेर ही सिरीज खास बजेट वापरकर्त्यांसाठी लाँच करण्यात आली आहे.
Vivo Y36 एकाच म्हणजे 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन व्हायब्रंट गोल्ड आणि मेटियर ब्लॅक या कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.
https://twitter.com/Vivo_India/status/1671768644659847168?ref_src=twsrc%5Etfw
तुम्ही ते ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart तसेच विवोच्या अधिकृत ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरवरून खरेदी करू शकता. या फोनच्या खरेदीवर, ICICI, SBI आणि इतर बँक कार्डवर 1,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाणार आहे.
हा फोन 6.64 इंच लांबीच्या FHD+ डिस्प्ले सह येतो. या डिस्प्ले रिफ्रेश रेट 90Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 4G प्रोसेसर आहे, जो 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटसह येतो. फोनची रॅम 8GB पर्यंत वाढवली जाऊ शकते, तर फोनचे इंटर्नल स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येईल. फोन Android 13 वर आधारित FuntouchOS 13 वर कार्य करतो.
याव्यतिरिक्त, फोनला पावर देण्यासाठी 5,000mAh बॅटरी आणि USB टाइप C 44W फास्ट चार्जिंग उपलब्ध आहे. Vivo Y36 च्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल, जो 50MP प्रायमरी आणि 2MP बोकेह कॅमेरासह उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल .