Vivo चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. प्रसिद्ध मोबाईल निर्माता Vivo ने Vivo Y36 आणि Vivo Y02t स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. स्मार्टफोन्सच्या कपातीसह बँक ऑफरद्वारे 1,000 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळणार आहे. काही कालावधीपूर्वीच हे दोन्ही मोबाईल भारतीय बाजारपेठेत दाखल झाले होते. आता त्यांना स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. वाचा सविस्तर-
Vivo Y36 स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला होता. Vivo ने घोषणा केली आहे की, Vivo Y36 स्मार्टफोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज पर्याय आता 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. जे जूनमध्ये 16,999 रुपयांना आणले होते. त्याबरोबरच, निवडक बँक कार्डने व्यवहार केल्यास डिव्हाइसवर 1,000 रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जात आहे. म्हणजेच, तुम्ही Vivo Y36 कमीत कमी 14,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
Vivo Y02t फोन तुम्हाला केवळ 10 हजार रुपयांच्या अंतर्गत खरेदी करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की या फोनसह कॅशबॅक लाभ मिळणार नाही. या स्मार्टफोनची किंमत लाँचिंगच्या वेळी 9,999 रुपये इतकी होती. मात्र, वापरकर्ते हा फोन फक्त 9,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. ही किंमत 4GB RAM + 64GB स्टोरेज पर्यायासाठी आहे.
दोन्ही फोन Flipkart, Vivo इंडिया ई-स्टोअर आणि सर्व भागीदार रिटेल स्टोअरवर खरेदी केले जाऊ शकतात.
Vivo Y36 स्मार्टफोन 2388×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.64-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आहे. ज्याला 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट मिळतो. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टा-कोर प्रोसेसर बसवण्यात आला आहे. बॅटरीच्या बाबतीत, 5,000 mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन Android 13 आधारित Funtouch OS 13 वर काम करतो.
Vivo Y36 मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल प्राइमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सेल बोकेह लेन्स उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Vivo Y02t स्मार्टफोनमध्ये 1600 × 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.51 इंच HD+ डिस्प्ले आहे. डिव्हाइसमध्ये कामगिरीसाठी MediaTek Helio P35 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android 13 आधारित Funtouch OS 13 वर काम करतो. फोन 5,000 mAh बॅटरी आणि 10W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येतो. Vivo Y02T स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह सुसज्ज F/2.0 अपर्चरसह 8-मेगापिक्सलचा सेन्सर आहे, तर सेल्फीसाठी 5-मेगापिक्सेल लेन्स प्रदान केला आहे.