Price Cut : Vivo Y35 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवे दर आणि भारी ऑफर्स

Price Cut : Vivo Y35 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवे दर आणि भारी ऑफर्स
HIGHLIGHTS

Vivo Y35 किमतीत कंपनीने कपात केली आहे.

या कपातीसह कंपनीने काही बँक ऑफर्स देखील सादर केले आहेत.

ICICI, SBI, kodak कार्ड्सवरून फोन खरेदी केल्यास 1,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.

Vivo Y35 कंपनीने मागील वर्षी भारतात लाँच केला होता. त्यानंतर, आता जवळपास वर्षभरानंतर या फोनची किंमत कमी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Vivo Y35 आता 17,499 रुपयांऐवजी 16,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. याबरोबरच, खास ऑफर देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

Vivo Y35 ची नवी किमंत आणि ऑफर्स 

वर सांगितल्याप्रमाणे, Vivo Y35 च्या किमतीत 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. म्हणजेच, हा फोन 16,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सवलतीनंतर, ICICI, SBI, kodak कार्ड्सवरून फोन खरेदी केल्यास 1,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. 

Vivo Y35 चे फीचर्स आणि स्पेक्स 

फोनमध्ये 6.58-इंच लांबीचा FHD + 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरने सपोर्ट आहे, जो 6nm चिपसेटवर आधारित आहे. फोन 8 GB रॅम आणि 8 GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट आणि 128GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतो. हे FunTouch OS 12 आधारित Android 12 वर कार्य करते.

Vivo Y35 फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 2MP बोकेह आणि 2MP मॅक्रो कॅमेरासह 50MP मेन कॅमेरा उपलब्ध आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 44W फ्लॅश चार्जिंगसह पॉवर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo