Vivo चा नवीन कमी किमतीचा Y-सीरीज स्मार्टफोन Y35 4G इंडोनेशियामध्ये लाँच झाला आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये फ्लॅट फ्रेम डिझाइन आणि वॉटरड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले आहे. फोनला 5000mAh बॅटरीचे समर्थन आहे. यात 50MP ट्रिपल-रियर कॅमेरा सेटअप आहे आणि स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. चला तर मग जाणून घेऊयात Vivo Y35 4G ची किंमत आणि फीचर्स…
हे सुद्धा वाचा : 19 मिनिटांत पूर्ण चार्ज होणाऱ्या OnePlus 10T 5G वर प्रथमच मिळतेय 18,000 रुपयांपेक्षा जास्त सूट, जाणून घ्या ऑफर
इंडोनेशियामध्ये Vivo Y35 4G च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वर्जनची किंमत IDR 3399000 म्हणजेच अंदाजे 18,500 रुपये आहे. हा फोन डॉन गोल्ड आणि एगेट ब्लॅक या दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. इंडोनेशियामध्ये 15 ऑगस्टपासून या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. Vivo Y35 4G ला आधीच BIS प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे ते लवकरच भारतात लाँच केले जाण्याची शक्यता आहे. भारतातील त्याची किंमत इंडोनेशियापेक्षा वेगळी असू शकते.
Vivo Y35 4G मध्ये फुल HD + रिझोल्यूशनसह 6.58-इंच लांबीची IPS LCD स्क्रीन आहे. स्क्रीनच्या टॉप सेंटरमध्ये वॉटर-ड्रॉप नॉच आहे आणि नियमित 90Hz रिफ्रेश रेट आहे. यात इंटर्नल स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आहे, ज्याला 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज (1TB एक्सटर्नल मेमोरी) दिलेली आहे. स्मार्टफोन 8GB व्हर्च्युअल मेमरीला सपोर्ट करतो. Vivo Y35 4G ची रॅम 16GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
याबरोबरच, फोनमध्येमागील बाजूस 50MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 2MP मॅक्रो सेन्सर आणि 2MP बोकेह सेन्सरसह तीन मागील कॅमेरा सेन्सर आहेत. सेल्फी घेण्यासाठी आणि व्हिडिओ कॉल करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइसमध्ये 44W रॅपिड चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरीचा समावेश आहे.