32MP सेल्फी कॅमेरासह Vivo Y300 Plus 5G फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 

32MP सेल्फी कॅमेरासह Vivo Y300 Plus 5G फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 
HIGHLIGHTS

Vivo कंपनीने Vivo Y300 Plus 5G फोन भारतात लाँच केला.

Vivo Y300 Plus 5G फोन मध्यम-श्रेणीमध्ये सादर करण्यात आला आहे.

HDFC, SBI Bank आणि ICICI Bank बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 1000 रुपयांची सूट

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या Vivo Y300 Plus 5G फोनच्या भारतीय लाँचची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. अखेर कंपनीने Vivo Y300 Plus 5G फोन भारतात लाँच केला आहे. हा फोन Vivo Y200 सिरीजचा उत्तराधिकारी आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तर, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP प्रायमरी आणि 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. जाणून घ्या Vivo Y300 Plus 5G फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: Realme P1 Speed ​​5G नवीनतम फीचर्ससह भारतात लाँच, जाणून घ्या किमत आणि सर्व Powerful फीचर्स

Vivo Y300 Plus 5G
Vivo Y300 Plus 5G

Vivo Y300 Plus 5G ची किंमत

Vivo Y300 Plus 5G फोन सिंगल 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर तुम्हाला HDFC, SBI Bank आणि ICICI Bank बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 1000 रुपयांची सूट मिळणार आहे. एवढेच नाही तर, तुम्ही हा फोन 3 किंवा 6 महिन्यांच्या नो कॉस्ट- EMI वर सादर करू शकता. तुम्हाला या फोनमध्ये सिल्क ब्लॅक आणि सिल्क ग्रीन असे दोन कलर ऑप्शन्स मिळणार आहे. अधिक माहितीसाठी vivo.com या अधिकृत साईटला भेट द्या.

Vivo Y300 Plus 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo चा नवा Vivo Y300 Plus 5G फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा FHD+ कर्व AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. हा फोन Android 14 आधारित Funtouch OS 14 वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळणार आहे. लक्षात घ्या की, या फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल.

Vivo Y300 Plus 5G
Vivo Y300 Plus 5G

फोटोग्राफीसाठी Vivo Y300 Plus 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी कॅमेरा देखील मिळेल. या फोनमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यासोबत तुम्हाला 44W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल. एवढेच नाही तर, वॉटर प्रोटेक्शनसाठी फोनला IP54 रेटिंग मिळाले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo