प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने आपले आगामी स्मार्टफोन Vivo Y300 5G काही दिवसांपूर्वी भारतात टीज केले होते. आता स्मार्टफोन ब्रँड Vivo ने अखेर या स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट जाहीर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही Vivo Y200 ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. या फोनला टायटॅनियम इन्स्पायर्ड डिझाइन देण्यात आले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Vivo Y300 च्या आधी Vivo Y300 Pro आणि Vivo Y300 Plus बाजारात लाँच झाले. जाणून घेउयात Vivo Y300 5G चे भारतीय लॉन्चिंग तपशील-
Also Read: Childrens Day 2024 Sale: तुमच्या मुलांना Best टॅब गिफ्ट करा! मिळतायेत मोठ्या सवलती आणि ऑफर्स
प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Vivo च्या मते Vivo Y300 5G भारतात 21 नोव्हेंबर 2024 ला लाँच होणार आहे. याबद्दल, कंपनीने आपल्या अधिकृत X हॅन्डलवर माहिती दिली आहे. मात्र, लक्षात घ्या की, अद्याप कंपनीने Vivo Y300 5G या किंमतीबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही. लीकनुसार, आगामी डिव्हाइसची किंमत 21,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान ठेवली जाण्याची शक्यता आहे. त्याच्या आगमनाने, Xiaomi, Vivo आणि Realme सारख्या स्मार्टफोन ब्रँडना बाजारात जोरदार स्पर्धेला सामोरे जावे लागेल.
ताज्या लीकनुसार, Vivo Y300 मध्ये 6.67 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा रीफ्रेश दर 120Hz असेल. सुरळीत कामकाजासाठी, हा फोन Qualcomm च्या Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह सज्ज असेल. त्याबरोबरच, नवीनतम Android 15 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यात 256GB अंतर्गत स्टोरेज देखील मिळू शकते. कनेक्टिव्हिटीसाठी, हँडसेटला ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS आणि USB टाइप-C पोर्ट प्रदान केले जाईल.
फोटोग्राफीसाठी, Vivo च्या आगामी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. या सेटअपमध्ये मुख्य सेन्सर 50MP असेल. त्याबरोबरच, पॉवर बॅकअपसाठी या Vivo Y300 मध्ये 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. या बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट मिळू शकतो. मात्र, लक्षात घ्या की, फोनची किंमत आणि सर्व कन्फर्म फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.