Price Cut! Vivo Y28s फोनच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किमतीत घट, जाणून घ्या नवी किंमत आणि सर्व तपशील 

Price Cut! Vivo Y28s फोनच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किमतीत घट, जाणून घ्या नवी किंमत आणि सर्व तपशील 
HIGHLIGHTS

Vivo Y28s 5G स्मार्टफोन जुलै महिन्यात भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता.

Vivo Y28s 5G फोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे.

Vivo Y28s 5G फोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे.

प्रसिद्ध टेक ब्रँड Vivo ने त्याच्या ‘Y’ सिरीजचा विस्तार करत Vivo Y28s 5G स्मार्टफोन जुलै महिन्यात भारतीय बाजारात लाँच केला होता. हा फोन कंपनीने 4GB, 6GB आणि 8GB रॅम व्हेरिएंटसह सादर केला. आपल्या चाहत्यांना गिफ्ट देत कंपनीने या तिन्ही व्हेरियंटच्या किमतीत घट केली आहे. Vivo Y28s च्या किमतीत 500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता Vivo Y28s ची नवी किंमत जाणून घेऊयात-

Also Read: एक नव्हे तर दोन डिस्प्लेसह देशी कंपनीचा नवीनतम Lava Agni 3 5G फोन लाँच, जाणून घ्या किंमत

Vivo Y28s Y28e with 5000mah battery launched in India check specs price

Vivo Y28s 5G फोनची नवी किंमत

Vivo Y28s फोनच्या 4GB रॅम + 128GB स्टोरेजची किंमत 13,999 रुपये, 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किमत 15,499 रुपये आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची 16,999 इतकी होती. कंपनीने यात 500 रुपयांची कपात केली आहे. कपातीनंतर या फोनच्या 4GB रॅम + 128GB स्टोरेजची किंमत 13,499 रुपये, 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,499 रुपये इतकी आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo Y28s 5G स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाइट आणि ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर नव्या किमतीत खरेदी करता येईल. हा Vivo फोन विंटेज रेड आणि ट्विंकलिंग पर्पल कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.

Vivo Y28s 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y28s 5G फोन 6.56 इंच लांबीच्या HD+ स्क्रीनवर लॉन्च करण्यात आला आहे. हा वॉटरड्रॉप नॉच स्टाइल डिस्प्ले आहे, जो LCD पॅनेलवर तयार केला गेला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 octa-core प्रोसेसर आहे. हा फोन IP6X धूळ प्रतिरोधक आणि IPX4 पाणी प्रतिरोधक आहे. या फोनमध्ये FM रेडिओ, 150% व्हॉल्यूम बूस्ट आणि स्प्लिट-स्क्रीन सारखी फीचर्स उपलब्ध आहेत.

Vivo Y28s features

फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह 50MP कॅमेरा आहे, जो Sony IMX852 सेन्सर आहे. यासोबतच, 2MP चा सेकंडरी सेन्सर देखील उपलब्ध आहे. तर, सेल्फीसाठी हा फोन 8MP फ्रंट पोर्ट्रेट कॅमेराला सपोर्ट करेल. पॉवर बॅकअपसाठी, Vivo Y28s 5G स्मार्टफोन 5,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. यासह कंपनी 4 वर्षांची बॅटरी हेल्थची गॅरंटी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo