प्रसिद्ध स्मार्टफोन्स ब्रँड Vivo ने युजर्सना नवीन वर्षानिमित्त एक उत्तम भेट दिली आहे. कंपनीने आपल्या Y-Series फोनच्या किमती कमी करून वर्ष संपण्यापूर्वी आपल्या चाहत्यांना भेट दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने Vivo Y28e, Vivo Y28s 5G, Vivo Y28 5G फोनच्या किमतीत एकूण 1000 रुपयांची घट केली आहे. फोन्सच्या नव्या किमती इ-कॉमर्स साईटवर लाईव्ह आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात फोनची Vivo Y28e, Vivo Y28s 5G, Vivo Y28 5G नवी किंमत:
Vivo Y28e फोनच्या 4GB + 64GB मॉडेलची किंमत पूर्वी 10,999 रुपये इतकी होती. पण, किमतीत झालेल्या कपातीनंतर आता फोनची नवीन किंमत 10,499 रुपये इतकी आहे. तर, फोनच्या 4GB + 128GB मॉडेलची किंमत पूर्वी 11,999 रुपये होती. पण, कपातीनंतर आता त्याची नवीन किंमत 11,499 रुपये आहे.
Vivo Y28s 5G फोनच्या 4GB + 128GB मॉडेलची किंमत पूर्वी 13,499 रुपये होती. पण, किंमत कपातीनंतर त्याची नवीन किंमत 12,999 रुपये आहे. तर, डिव्हाइसच्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत पूर्वी 14999 रुपये होती, तर त्याची नवीन किंमत 14,499 रुपये इतकी झाली आहे. फोनच्या 8GB+ 128GB मॉडेलची किंमत पूर्वी 16,499 रुपये इतकी होती. पण, किंमत कपातीनंतर आता त्याची नवीन किंमत 15,999 रुपये इतकी आहे.
Vivo Y28 5G च्या 4GB + 128GB मॉडेलची किंमत पूर्वी 13,499 रुपये होती. पण, किमतीत कपातीनंतर फोनची नवीन किंमत 12,999 रुपये आहे. तर, डिव्हाइसच्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत पूर्वी 14,999 रुपये होती आणि नवीन किंमत 14,499 रुपये इतकी आहे. याव्यतिरिक्त, डिव्हाइसच्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत पूर्वी 16,499 रुपये होती. तर किमतीत कपातीनंतर फोनची नवीन किंमत 15,999 आहे.
Vivo च्या Y28s आणि Y28e मध्ये 6.56 इंच लांबीचा हाय ब्राइटनेस सनलाइट डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. तर, Vivo Y28s मध्ये HD+LCD आहे आणि Y28e मध्ये HD डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हे दोन्ही फोन्स MediaTek Dimensity 6100+5G प्रोसेसरसह सुसज्ज आहे. दोन्ही फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे. तर, फोटोग्राफीसाठी Vivo Y28s ला सेगमेंटमध्ये पहिला 50MP Sony IMX852 कॅमेरा मिळत आहे. तर Vivo Y28e मध्ये 13MP मुख्य लेन्स आहे.
या फोनमध्ये 6.64 इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Dimensity 6020 5G प्रोसेसरवर कार्य करतो. Vivo Y28 5G च्या मागील पॅनलमध्ये डुअल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. Vivo Y28 5G फोनचा मुख्य कॅमेरा 50MP आहे तर दुय्यम कॅमेरा 2MP आहे. समोर तुम्हाला 8MP सेल्फी कॅमेरा दिसेल. तर, पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह कार्य करतो.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.