लेटेस्ट Vivo Y28 सिरीजचे स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत 10,999 रुपयांपासून सुरू
लेटेस्ट Vivo Y28 सिरीज भारतात लाँच झाली आहे.
या सिरीजअंतर्गत Vivo Y28s आणि Vivo Y28e स्मार्टफोनचा समावेश आहे.
Vivo Y28 सिरीजची सुरुवातीची किंमत 10,999 रुपये इतकी आहे.
Vivo Y28 Series: लेटेस्ट Vivo Y28 सिरीज भारतात लाँच करण्यात आली आहे. ही कंपनीची नवीनतम बजेट स्मार्टफोन सिरीज आहे. या सिरीजअंतर्गत Vivo Y28s आणि Vivo Y28e स्मार्टफोनचा समावेश आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन MediaTek Dimensity 6100+ 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. तर, Vivo Y28E फोनमध्ये 13MP प्राथमिक कॅमेरा आहे. Vivo Y28 सिरीजमधील फोन्सच्या किमती आणि सर्व तपशील-
Also Read: आकर्षक इंटरचेंज बॅक पॅनलसह CMF Phone 1 फोन भारतीय बाजारात लाँच, प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे किंमत
Vivo Y28 सिरीजची भारतीय किंमत
कंपनीने Vivo Y28s फोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. फोनच्या 4GB रॅम + 128GB स्टोरेज, 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंट असे तीन प्रकार आहेत. या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 13,999 रुपये, 15,499 रुपये आणि 16,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन तुम्ही या व्हिंटेज रेड आणि ट्विंकलिंग पर्पल या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
Vivo Y28e फोन दोन व्हेरिएंटमध्ये भारतात सादर करण्यात आला आहे. फोनच्या 4GB+64GB बेस व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. तर, 4GB + 128GB स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. हा फोन विंटेज रेड आणि ब्रीझ ग्रीन या दोन कलर ऑप्शन्समध्ये मिळेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध असेल.
Vivo V28s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले
Vivo V28s फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD + LCD डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह आहे. Vivo V28e फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे.
प्रोसेसर
परफॉर्मन्ससाठी Vivo V28s फोन MediaTek Dimensity 6100+ 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा Vivo V28e फोन MediaTek Dimensity 6100+ 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे.
कॅमेरा
Vivo V28s मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP Sony IMX 852 प्राथमिक कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. तर, Vivo V28e फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. मात्र, या फोनमध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP कॅमेरा उपलब्ध आहे.
बॅटरी
Vivo V28s फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 15W फ्लॅश चार्ज सपोर्ट उपलब्ध आहे. तर, Vivo V28e या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 15W फ्लॅश चार्ज सपोर्ट उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile