Vivo Y28 5G Launched: 5000mAh बॅटरीसह नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News 

 Vivo Y28 5G Launched: 5000mAh बॅटरीसह नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News 
HIGHLIGHTS

नवा बजेट स्मार्टफोन Vivo Y28 5G भारतात गुपचूपपणे लाँच

Vivo Y28 5G ची सुरुवातीची किंमत 13,999 रुपये आहे.

Vivo Y28 5G नवीन स्मार्टफोन Vivo Y27 चे अपग्रेडेड व्हर्जन आहे.

Vivo ने आपला नवा बजेट स्मार्टफोन Vivo Y28 5G भारतात गुपचूपपणे लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा Y-सीरीजचा नवीन स्मार्टफोन आहे, जो Vivo Y27 चे अपग्रेडेड व्हर्जन म्हणून लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये कमी किमतीत अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. मुख्य स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन मोबाइल फोनमध्ये MediaTek 6020 प्रोसेसर आणि Mali G57 GPU आहे. तसेच, यात 15W जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी आहे. चला तर मग जाणून घेऊयात Vivo Y28 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

हे सुद्धा वाचा: Infinix Smart 8 फोन नवा Affordable स्मार्टफोन ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी। Tech News

Vivo Y28 5G ची किंमत

Vivo Y28 5G भारतीय बाजारात 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोन्सची किंमत अनुक्रमे 13,999 रुपये, 15,499 रुपये आणि 16,999 रुपये इतकी आहे. हा फोन ग्लिटर एक्वा आणि क्रिस्टल पर्पल कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन Amazon, Reliance Digital, Croma, JioMart आणि इतर रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल.

vivo y28 5g specs

स्मार्टफोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे डिव्‍हाइस Amazon, Reliance Digital, Croma, JioMart आणि इतर रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

Vivo Y28 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y28 5G मध्ये 6.56-इंच लांबीचा IPS HD+ पंच-होल LCD डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येईल. फोनच्या सुरळीत कामकाजासाठी, फोनमध्ये MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर, Mali G57 GPU देण्यात आला आहे. या फोनसह विस्तारित रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज आहे, जे मायक्रो SD कार्डच्या मदतीने वाढवता येईल. लक्षात घ्या की, हा फोन Android 13 आधारित FunTouch OS 13 वर काम करतो.

कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo ने या स्मार्टफोनमध्ये LED लाईटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP मुख्य सेन्सर (अपर्चर f/1.8) आणि 2MP सेकंडरी लेन्स (अपर्चर f/2.4) आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस f/2.0 अपर्चरसह 8MP कॅमेरा मिळेल. फोनमध्ये पॉवरसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W फास्ट चार्जिंगसह येईल.

फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह फेस अनलॉक फिचर आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, ब्लूटूथ 5.1, GPS, ग्लोन्स, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट आहे. पाण्याच्या प्रतिकारासाठी फोनला IP54 रेटिंग मिळाली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo