Good News! Vivo Y27 आणि Vivo T2 फोनच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News 

Good News! Vivo Y27 आणि Vivo T2 फोनच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

Vivo च्या लोकप्रिय Vivo Y27 आणि Vivo T2 स्मार्टफोच्या किमतीत कपात

Vivo Y27 च्या किमतीत 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

Vivo T2 च्या किमतीत कपात केल्यानंतर फोनची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये

Vivo कंपनीने आपले दोन्ही स्मार्टफोन स्वस्त केले आहेत. कंपनीने आपल्या दोन्ही लोकप्रिय स्मार्टफोन Vivo Y27 आणि Vivo T2 च्या किमतीत घट केली आहे. दोन्ही फोन 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतात. Vivo Y27 स्मार्टफोन MediaTek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. तर, Vivo T2 फोन 64MP कॅमेरासह येतो. कपातीनंतर हे स्मार्टफोन्स तुम्हाला आणखी स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. चला बघुयात नव्या किमती-

हे सुद्धा वाचा: लेटेस्ट OPPO Reno11 5G वर तब्बल 5000 रुपयांचा Discount, मिळतेय बंपर ऑफर। Tech News

Vivo Y27 ची नवी किंमत

कंपनीने Vivo Y27 च्या सिंगल 6GB रॅम आणि 128GB मॉडेलची किंमत 1000 रुपयांनी कमी केली आहे. या मॉडेलची किंमत 12,999 रुपये होती. मात्र, आता कंपनीने हा फोन 1000 रुपयांनी स्वस्त केला आहे. किंमतीमध्ये कपात केल्यानंतर हा फोन आता 11,999 रुपयांना खरेदी करता येईल.

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.64 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. हा फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Vivo T2 ची नवी किंमत

VIVO T2 5G

तर दुसरीकडे, Vivo T2 फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 18,999 रुपये होती. तर, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 20,999 रुपयांना उपलब्ध होते. फोनच्या किमतीत कपात केल्यानंतर हे मॉडेल्स अनुक्रमे 15,999 आणि 17,999 रुपयांना खरेदी करता येतील.

Vivo T2 मध्ये 6.38 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 4,500mAh आहे, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo