नुकतेच लाँच झालेला Vivo Y200e 5G ची पहिली विक्री आजपासून सुरु, जाणून घ्या किंमत आणि Best ऑफर्स। Tech News 

नुकतेच लाँच झालेला Vivo Y200e 5G ची पहिली विक्री आजपासून सुरु, जाणून घ्या किंमत आणि Best ऑफर्स। Tech News 
HIGHLIGHTS

लेटेस्ट Vivo Y200e 5G स्मार्टफोनची विक्री Amazon वर सुरु

फोनमध्ये इको-फायबर लेदर फिनिशसह बॅक-पॅनल आहे.

HDFC, SBI आणि सिटी बँके कार्डद्वारे पेमेंट व्यावहार केल्यास 1000 रुपयांची झटपट सूट

नुकतेच Vivo ने Vivo Y200e 5G काही दिवसांपूर्वी भारतात लाँच केला. त्यानंतर आज म्हणजेच 27 फेब्रुवारीपासून या नवीनतम स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर लाईव्ह झाली आहे. पहिल्या सेलदरम्यान या फोनच्या खरेदीवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत. तसेच, डिव्हाइसवर भारी एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनमध्ये इको-फायबर लेदर फिनिशसह बॅक-पॅनल आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo Y200e 5 ची किंमत आणि ऑफर्स-

Vivo Y200e 5G ची किंमत आणि ऑफर्स

आम्ही तुम्हाला सांगतो की, Vivo ने Y200e 5G च्या 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, त्याचे टॉप मॉडेल म्हणजेच 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये इतकी आहे. फोनवर उपलब्ध पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC, SBI आणि सिटी बँके कार्डद्वारे पेमेंट व्यावहार केल्यास 1000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, फोनवर 19,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 1,018 रुपये प्रति महिना EMI उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

vivo y200e 5g

Vivo Y200e 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y200e 5G या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये सुरळीत कामकाजासाठी Qualcomm चा Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB LPDDR4x रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. त्याबरोबरच, सिक्योरिटीसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर उपलब्ध आहे. तसेच, नवीनतम Android 14 आधारित FuntouchOS 14 वर कार्य करेल.

ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन ड्युअल रियर कॅमेरासह सुसज्ज आहे. या Vivo स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP सेन्सर मिळेल, त्यासह LED लाईटदेखील उपलब्ध आहे. याशिवाय, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी डिव्हाइसच्या पुढील बाजूस 16MP कॅमेरा उपलब्ध आहे. या फोनमध्ये 5,000mAh जंबो बॅटरी आहे, जी 44W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येते. या बॅटरीसोबत काही मूलभूत कार्यांसह फोन दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo