64MP कॅमेरासह Vivo Y200 Pro 5G वर मिळतेय 5000 रुपयांची सूट, Flipkart वर भारी डील उपलब्ध
Vivo Y200 Pro 5G स्मार्टफोनवर अप्रतिम ऑफर्स आणि सवलती उपलब्ध
Amazon वर Vivo Y200 Pro 5G फोन थेट 4000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध
सवलतींसह या फोनवर बँक ऑफर्स, EMI, कॅशबक इ. ऑफर्स देखील मिळणार आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या लोकप्रिय स्मार्टफोन्सवर सध्या भारी ऑफर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यापैकी एक म्हणजे Vivo Y200 Pro 5G स्मार्टफोनवर देखील अप्रतिम ऑफर्स आणि सवलती उपलब्ध आहेत. ही डील तुम्हाला प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर मिळेल. सवलतींसह या फोनवर बँक ऑफर्स, EMI, कॅशबक इ. ऑफर्स देखील मिळणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo Y200 Pro 5G ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
Also Read: iPhone लव्हर्स! लेटेस्ट iPhone 16 वर तब्बल 7000 रुपयांचा Discount, भारी ऑफर्सचा होतोय वर्षाव
Vivo Y200 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स
Vivo Y200 Pro 5G फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 24,999 रुपयांना 4000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी केला जाऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनची MRP 29,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vivo Y200 Pro 5G फोन HDFC बँक कार्डद्वारे 1000 रुपयांच्या सवलतीसह मिळेल. या सवलतीनंतर हा फोन 23,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
त्याबरोबरच, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5% अमर्यादित कॅशबॅक मिळेल. तर, सर्व बँकांच्या क्रेडिट कार्डवर नॉन EMI व्यवहारांवर 750 रुपयांची सूट मिळेल. यासह, नो कॉस्ट EMI चे पर्याय देखील उपलब्ध आहे. EMI 4,167 रुपये दरमहा आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
Vivo Y200 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Vivo Y200 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा 3D कर्व AMOLED डिस्प्ले मिळेल, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याबरोबरच, हा फोन Funtouch OS 14 वर कार्य करतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे. या फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येईल.
Vivo Y200 Pro 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा आहे. त्याबरोबरच, यात 2MP सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळणार आहे, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. काही बेसिक कार्यांसह हा फोन दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile