64MP मेन कॅमेरासह Vivo Y200 Pro 5G भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स। Tech News

Updated on 21-May-2024
HIGHLIGHTS

Vivo चा Vivo Y200 Pro 5G भारतात लाँच करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे नव्या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी आहे.

Vivo Y200 Pro 5G ची किंमत 24,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला Vivo चा Vivo Y200 Pro 5G भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या Y-सिरीजचा हा नवीन स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये सर्वात स्लिम कर्व 3D डिस्प्ले आहे. Vivo चा हा नवीन स्मार्टफोन बाजारात Oppo, Xiaomi, Samsung आणि Realme सारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सना जबरदस्त टक्कर देतो. विशेष म्हणजे नव्या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात किंमत आणि सर्व तपशील-

हे सुद्धा वाचा: लेटेस्ट Infinix GT 20 Pro स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या आणि टॉप 5 फीचर्स। Tech News

Vivo Y200 Pro 5G launched

Vivo Y200 Pro 5G ची किंमत

Vivo Y200 Pro 5G ची किंमत 24,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. फोनच्या 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज तुम्हाला या किमतीत मिळणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, 1500 रुपयांची बँक सूट आणि 6 महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI देखील देण्यात येत आहे. एवढेच नाही तर, यावर 15 दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी देखील उपलब्ध आहे. Vivo चा हा नवा फोन अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केला जाऊ शकतो.

Vivo Y200 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y200 Pro 5G मध्ये 6.78 इंच लांबीचा 3D कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. विशेष म्हणजे या डिस्प्लेसह यूजर्सना वॉटर फॉल सारखा व्ह्यूइंग एक्सपेरियन्स मिळेल. उत्तम परफॉर्मन्ससाठी, यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज मिळेल. डेटा सुरक्षिततेसाठी हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक आहे.

Vivo Y200 Pro Features

उत्तम फोटोग्राफीसाठी फोनमध्ये LED फ्लॅश लाइटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये पहिला सेन्सर 64MP आणि दुसरा 2MP चा सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 16MP कॅमेरा मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000mAh बॅटरी आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :