तारीख नोट करा! Vivo Y200 5G ची लाँच डेट जाहीर, Affordable किमतीत येईल का फोन? Tech News
Vivo India कडून Vivo Y200 5G फोन लाँच करण्याची तारीख जाहीर
फोनची किंमत 25 हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता
फोन Xiaomi, Oppo आणि Samsung सारख्या ब्रँडच्या मिड-रेंज फोनशी स्पर्धा करणार
Vivo Y200 5G ची भारतात लॉन्चिंगची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आता अखेर Vivo India ने हा मोबाईल फोन लाँच करण्याची तारीख जाहीर केली आहे. आत्तापर्यंत या फोनशी संबंधित अनेक रिपोर्ट्स समोर आले आहेत, ज्यावरून फोनचे फीचर्स प्रकट होत आहेत. तसेच फोनची अपेक्षित किंमत देखील उघड करण्यात आली आहे. हा फोन Xiaomi, Oppo आणि Samsung सारख्या ब्रँडच्या मिड-रेंज फोनला टक्कर देईल, असे देखील म्हटले जात आहे.
Surveyहे सुद्धा वाचा: itel A05s फोन Latest Budget स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत 7 हजारांपेक्षा कमी। Tech News
Vivo Y200 5G लाँच डेट
Vivo Y200 5G स्मार्टफोन भारतात 23 ऑक्टोबर रोजी लाँच होणार आहे. मात्र, हा फोन कोणत्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
Dive into the future with the all-new vivo Y200 5G: where innovation meets style!
— vivo India (@Vivo_India) October 16, 2023
Launching on 23rd October. Know more https://t.co/Mvp38dMyyb#vivoY200 #5G #SpreadYourAura #ItsMyStyle #vivoYSeries pic.twitter.com/RhECyR4MMu
Vivo Y200 5G ची अपेक्षित किंमत
Vivo ने अद्याप Y200 5G च्या किंमतीबाबत कोणतेही अधिकृत अपडेट दिलेले नाही. मात्र, लीक आणि रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, फोनची किंमत 25 हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
Vivo Y200 5G
लीकनुसार, Vivo Y200 5G ला V27 Pro प्रमाणे स्मार्ट ऑरा लाइट देण्यात येणार आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले मिळेल. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास, स्नॅपड्रॅगन 4 Gen 1 प्रोसेसर, 8GB RAM आणि 128GB स्टोरेज अखंड कार्यासाठी दिले जाऊ शकते. तसेच, फोटोग्राफीसाठी हँडसेटमध्ये 64MP कॅमेरा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
या व्यतिरिक्त, Vivo Y200 स्मार्टफोनमध्ये 4800mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तसेच Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-V पोर्ट सारखी फीचर्स असतील. मात्र, पुन्हा एकदा लक्षात घ्या की, फोनची खरी किंमत आणि कन्फर्म फीचर्स लाँचनंतरच पुढे येतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile