50MP कॅमेरासह नवा Affordable Vivo Y18 फोन भारतात लाँच, किंमत 9,000 रुपयांपेक्षा कमी। Tech News 

50MP कॅमेरासह नवा Affordable Vivo Y18 फोन भारतात लाँच, किंमत 9,000 रुपयांपेक्षा कमी। Tech News 
HIGHLIGHTS

Vivo चा नवा Vivo Y18 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे.

नवा फोन अलीकडेच लाँच झालेल्या Vivo Y18e ची अपग्रेडेड आवृत्ती आहे.

कंपनीने Vivo Y18 स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे.

Vivo चा नवा Vivo Y18 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा फोन अलीकडेच लाँच झालेल्या Vivo Y18e ची अपग्रेडेड आवृत्ती आहे. हा फोन कंपनीने बजेट विभागात सादर केला आहे. या Vivo फोनमध्ये 6.56 इंच HD+ डिस्प्ले असू शकतो. याशिवाय हा फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Vivo Y18 फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

हे सुद्धा वाचा: Vodafone Idea New Plan: कंपनीने लाँच केले नवे इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन्स, किंमत फक्त 749 रुपयांपासून सुरु। Tech News

Vivo Y18 ची भारतीय किंमत

Vivo Y18 image cradit-91mobiles Hindi

कंपनीने Vivo Y18 स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फक्त 8,999 रुपये इतकी आहे. तर, फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांना सादर केला गेला आहे. हा फोन तुम्हाला Vivo India च्या वेबसाइटवरून खरेदी करता येईल. फोनची विक्री आजपासून सुरू झाली आहे.

Vivo Y18 चे फीचर्स आणि स्पेक्स

Vivo Y18 फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. त्याबरोबरच, हा फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. सुरळीत कामकाजासाठी MediaTek Helio G85 प्रोसेसर अगदी योग्य आहे. फोनमध्ये 4GB विस्तारित रॅम उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, तुम्ही मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज वाढवू शकता. पाणी संरक्षणासाठी फोनला IP54 रेटिंग मिळाली आहे. तर, सुरक्षेसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

फोटोग्राफीसाठी Vivo फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे, ज्यामध्ये VGA सेन्सर आहे. यामध्ये LED फ्लॅशलाही स्थान देण्यात आले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील आहे, जी 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB टाइप-C सपोर्ट देखील आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo