Vivoने आपला नवीन बजेट रेंज स्मार्टफोन Y17s भारतात लाँच केला आहे. काही दिवसांपूर्वी हा फोन सिंगापूरमध्ये सादर करण्यात आला होता. Vivo च्या Y सीरीजचे अनेक स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत आणि त्यांना खूप पसंती देखील दिली जात आहे. आता कंपनीने बजेट रेंजमध्ये आणखी एक स्मार्टफोन Vivo Y17s आणला आहे. चला तर जाणून घेऊयात स्मार्टफोनची किंमत आणि सर्व तपशील-
Vivo Y17s चा बेस व्हेरिएंट 11,499 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. बेस्ट व्हेरिएंटमध्ये 4GB रॅमसह 64GB इंटर्नल स्टोरेज आहे. स्मार्टफोनच्या टॉप 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे. हा फोन ग्लिटर पर्पल आणि फॉरेस्ट ग्रीन कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart, Amazon आणि Vivo इंडियाच्या ई-स्टोअरवरून खरेदी करता येईल.
Vivo Y17s फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ LCD डिस्प्ले आहे, ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1612×720 इतके आहे. यामध्ये कंपनीने MediaTek Helio G85 प्रोसेसर दिला आहे. फोन 4GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह येतो. मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येते. हे Android 13 वर आधारित FunTouch OS 13 वर चालते. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP मेन कॅमेरा आणि मागील बाजूस 2MP सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, उत्तम फोटोग्राफीसाठी फोनमध्ये नाईट मोडसारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 15W फ्लॅशचार्जच्या समर्थनासह येते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ 5.0 आणि टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.