Vivo ने भारतात आपली Y सीरीज वाढवत Vivo Y17 स्मार्टफोन लॉन्च केला आहे आणि याची किंमत Rs 17,990 ठेवण्यात आली आहे. फोन मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि डिवाइसच्या मागे AI ट्रिपल कॅमेरा सेटअपला जागा देण्यात आली आहे. डिवाइस फक्त एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे आणि डिवाइस मिनरल ब्लू आणि मिस्टिक पर्पल कलर्स मध्ये उपलब्ध आहे आणि ऑफलाइन स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. हा फोन अल्ट्रा गेम मोड सह येतो जो चांगला गेमिंग एक्सपीरियंस देईल.
Vivo Y17 मध्ये 6.35 इंचाचा Halo FullView डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा ऍस्पेक्ट रेश्यो 19.3:9 आहे आणि याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 89 टक्के आहे. डिवाइस मीडियाटेक हीलियो P35 प्रोसेसर द्वारा संचालित आहे जो TSMC 12nm FinFET वर बनवण्यात आला आहे आणि 2.3GHz पर्यंतच्या स्पीड वर क्लोक्ड आहे. स्मार्टफोन मध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन कंपनीच्या फनटच OS 9 वर चालतो आहे जो एंड्राइड 9.0 वर आधारित आहे.
कॅमेरा डिपार्टमेंटचा विषय घ्यायचा झाल्यास डिवाइस मध्ये AI ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 13MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, दुसरा 8MP चा वाइड-एंगल सेंसर आहे आणि तिसरा 2MP चा डेप्थ सेंसर आहे. वाइड एंगल कॅमेरा सेंसर 120-डिग्री फील्ड ऑफ व्यू सह येतो पण वास्तविकपणे हा 108 डिग्री कॅप्चर करतो. विवो वाई17 च्या फ्रंटला 20MP चा सेंसर देण्यात आला आहे जो AI फेस ब्यूटी फीचर सह येतो आणि फोटो इन-बिल्ट कस्टममाइज सोल्यूशन सह वाढतो. फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W डुअल इंजन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि नाइन चार्जिंग प्रोटेक्शन टेक्नोलॉजी सह सादर करण्यात आली आहे.