हँडसेट निर्माता Vivo ने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी आपला नवीन मिड रेंज स्मार्टफोन Vivo Y100 लाँच केला आहे. कंपनीने हा लेटेस्ट Y सीरीज स्मार्टफोन कलर चेंजिंग बँक पॅनलसह लाँच केला आहे, म्हणजेच या फोनच्या मागील पॅनलवर सूर्य प्रकाश पडताच त्याचा रंग आपोआप बदलेल.
हे सुद्धा वाचा : Airtel की Jio! बघा कोणत्या कंपनीचा 3GB दैनिक डेटा प्लॅन आहे स्वस्त ?
या Vivo स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. लाँच ऑफर अंतर्गत जर कोणत्याही ग्राहकाने हा रंग बदलणारा फोन खरेदी करताना ICICI, HDFC किंवा SBI क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे बिल भरले तर त्यांना 1000 रुपयांची त्वरित सूट दिली जाईल.
कंपनीच्या ऑनलाइन ई-स्टोअर व्यतिरिक्त ई-कॉमर्स साइट Amazon वर ग्राहकांसाठी Vivo Y100 ची विक्री सुरू झाली आहे. तुम्हाला हा नवीनतम फोन ट्वायलाइट गोल्ड, मेटल ब्लॅक आणि पॅसिफिक ब्लू कलरमध्ये मिळेल. Amazon वरील ग्राहकांच्या सोयीसाठी, EMI आणि नो-कॉस्ट EMI सुविधा या उपकरणासोबत दिली जात आहे, हा हँडसेट 1194 रुपये प्रति महिना प्रारंभिक EMI सह खरेदी केला जाऊ शकतो.
https://twitter.com/MAHESHTELECOM/status/1623994441609678848?ref_src=twsrc%5Etfw
या नवीनतम फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.38-इंच फुल HD प्लस रिझोल्यूशन AMOLED डिस्प्ले आहे, जो 1300 nits ची कमाल ब्राइटनेस ऑफर करतो. याशिवाय या हँडसेटमध्ये HDR10 Plus सपोर्टही उपलब्ध आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या Vivo फोनला MediaTek Dimensity 900 octa-core प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Mali G68 GPU देण्यात आला आहे.
Vivo Y100 मध्ये 8 GB RAM सह 128 GB इंटरनल स्टोरेज आहे, फोनमध्ये तुम्हाला 8 GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट मिळेल. म्हणजेच, 8 GB च्या किंमतीत तुम्हाला 16 GB रॅमचा लाभ घेता येईल. हा नवीनतम Vivo फोन Android 13 वर आधारित Funtouch OS 13 वर काम करतो.
फोनमध्ये 44 W फ्लॅशचार्ज फास्ट चार्ज सपोर्टसह 4500 mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरासह 2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.