digit zero1 awards

Vivo Y100 and Y100A Price cut in India: पुन्हा एकदा स्वस्त झाले कंपनीचे स्मार्टफोन्स, 2000 रुपयांची कपात

Vivo Y100 and Y100A Price cut in India: पुन्हा एकदा स्वस्त झाले कंपनीचे स्मार्टफोन्स, 2000 रुपयांची कपात
HIGHLIGHTS

Vivo Y100 and Y100A स्मार्टफोन्सच्या किमतीत दुसऱ्यांदा कपात

दोन्ही स्मार्टफोन्सच्या किमतीत प्रत्येकी 2000 रुपयांची कपात केली आहे.

ICICI, SBI, येस बँक आणि IDFC बँक कार्डद्वारे फोनवर 2000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक

Vivoने यावर्षी Vivo Y100 आणि Y100A स्मार्टफोनची मे महिन्यात दोन्ही स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली होती. मात्र, हे स्मार्टफोन्स खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे की, या स्मार्टफोन्सची किंमत पुन्हा एकदा कमी झाली आहे. हो या दोन्ही स्मार्टफोन्सवर दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे. जाणून घेऊयात दोन्ही स्मार्टफोन्सची नवी किंमत आणि उपलब्ध ऑफर्स. 

नवीन किमती आज 18 सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. यासह तुम्ही Flipkart आणि Vivo India वेबसाइटवरून फोन खरेदी करू शकता.

vivo y100 and y100a

Vivo Y100 and Y100A Price cut in India

Vivoने Vivo Y100 आणि Y100A या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किमतीत प्रत्येकी 2000 रुपयांची कपात केली आहे. Vivo Y100 आणि Vivo Y100A स्मार्टफोनची 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची नवी किंमत 21,999 रुपये आहे. तर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,999 रुपये झाली आहे. यापूर्वी, हे दोन्ही फोन अनुक्रमे 23,999 रुपये आणि 25,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध होते.

 कंपनीने दोन्ही फोनवर बँक ऑफरही उपलब्ध करून दिली आहे. तुम्हाला ICICI, SBI, येस बँक आणि IDFC बँक कार्डद्वारे फोनवर 2000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. 

Vivo Y100 and Y100A चे स्पेसिफिकेशन्स 

 दोन्ही फोन 6.38 इंच लांबीच्या डिस्प्लेसह येतात, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. याशिवाय, Vivo Y100 फोन MediaTek Dimensity 900 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासह, तुम्हाला स्नपियर ऍप रिस्पॉन्स, गेम्समध्ये फास्टर FPS आणि उत्तम कनेक्शन अनुभव मिळेल. 

 तर, Vivo Y100A फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर उपलब्ध आहे. स्नॅपड्रॅगन 695 5G हाय-बँडविड्थ, लो लेटेन्सी कनेक्शन देते, जे अखंड उत्पादकता आणि मनोरंजन सक्षम करेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 64MP मेन, 2MP सेकंडरी आणि 2MP चा तिसरा कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी दोन्ही फोनमध्ये 16MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo