Surprise! Vivoच्या आणखी दोन लोकप्रिय Bugdet स्मार्टफोन्सची Price Drop, आता मिळेल ‘इतकं’ स्वस्त। Tech News
कंपनीने Vivo Y16 आणि Vivo Y02t च्या किमतीत कपात केली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाही Vivo Y02t फोनच्या किमतीत कपात करण्यात आली होती.
Vivo Y16 मध्ये 13 मेगापिक्सल AI प्राइमरी कॅमेरा लेन्स मिळतो.
आजकाल आपण सतत ऐकत आहोत की, Vivo आपल्या बजेट स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात करत आहे. अशातच, आणखी एक बातमी आली आहे की, Vivo ने आपल्या आणखी दोन बजेट स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. होय, कंपनीने Vivo Y16 आणि Vivo Y02t च्या किमतीत कपात केली आहे. कपातीनंतर, या फोनची सुरुवातीची किंमत 8,999 रुपये झाली आहे. सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घ्या.
Vivo Y02t ची नवी किंमत
आम्ही तुम्हाला सांगतो की, या महिन्याच्या सुरुवातीलाही Vivo Y02t फोनच्या किमतीत कपात करण्यात आली होती. आता परत या फोनच्या किमतीत झालेल्या कपातीनंतर फोनचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 9,499 रुपयांऐवजी 8,999 रुपयांना खरेदी करता येईल. फोनमध्ये 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
Vivo Y16 ची नवी किंमत
Vivo Y16 फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 10,999 रुपयांऐवजी 10,499 रुपयांना खरेदी करता येईल. तर, फोनचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 12,499 रुपयांऐवजी 10,999 रुपयांना खरेदी करता येईल.
Vivo Y02t चे मुख्य तपशील
Vivo Y02t स्मार्टफोनमध्ये 6.51 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्यामध्ये ‘U’ आकाराचा वॉटरड्रॉप नॉच आहे. तसेच, परफॉर्मन्ससाठी MediaTek Helio P35 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. या मोबाईलमध्ये 4GB रॅमसह 4GB व्हर्च्युअल रॅम आहे आणि 64GB इंटर्नल स्टोरेज आहे. Vivo Y02T स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह F/2.0 अपर्चरसह 8MPचा सेन्सर आहे, तर सेल्फीसाठी 5MPची लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आणि जी 10W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो.
Vivo Y16 चे मुख्य स्पेसिफिकेशन्स
Vivo Y16 मध्ये 6.51 इंच लांबी चा IPS LCD HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये Octa core MediaTek Helio P35 चिपसेट बसवण्यात आला आहे. डिव्हाइस 4GB RAM आणि 64GB इंटर्नल स्टोरेजच्या सपोर्टसह येतो. यासह, 1GB चा एक्सटेंडेड रॅम सपोर्ट उपलब्ध आहे. तसेच, Vivo Y16 मध्ये 5000mAh बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्ट आहे.
फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 13 मेगापिक्सल AI प्राइमरी कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile