digit zero1 awards

Price Cut! Vivo च्या तब्बल तीन बजेट स्मार्टफोन्सच्या किमतीत मोठी कपात, बघा नवी किंमत 

Price Cut! Vivo च्या तब्बल तीन बजेट स्मार्टफोन्सच्या किमतीत मोठी कपात, बघा नवी किंमत 
HIGHLIGHTS

ब्रँडने आपल्या Y-सीरीजच्या तीन स्मार्टफोन्स म्हणेजच Vivo Y36, Vivo Y27 आणि Vivo Y22 ची किंमत कमी केली.

तिन्ही स्मार्टफोन्सची किमंत 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

त्याबरोबरच, स्मार्टफोन्सवर बँकद्वारे 10% सूट देखील मिळेल.

Vivo भारतीय वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी कंपनी दररोज नवनवीन ऑफर सादर करत असते. कंपनीचे स्वस्त फोन भारतात मोठ्या प्रमाणात विकले जातात. त्यातच, आता या सणासुदीच्या हंगामात, ब्रँडने आपल्या Y-सीरीजच्या तीन स्मार्टफोन्स म्हणेजच Vivo Y36, Vivo Y27 आणि Vivo Y22 ची किंमत कमी केली आहे. जर तुम्ही आजकाल स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हे स्मार्टफोन्स कमी किंमतीत उत्तम फीचर्ससह उपलब्ध आहेत. चला तर मग बघुयात तिन्ही स्मार्टफोनच्या नव्या किमती.

हे सुद्धा वाचा: Amazon GIF 2023: 3 हजार रुपयांपेक्षा कमी होम थिएटर्स, फेस्टिव्हल पार्टीमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज व्हा!

Vivo Y36 ची नवी किंमत

vivo y36

Vivo चा Vivo Y36 स्मार्टफोन आधी 15,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध होता. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटसाठी आहे. आता ब्रँडने या स्मार्टफोनची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे. म्हणजेच तुम्ही हा डिवाइस आता फक्त 14,999 रुपयांना खरेदी करू शकता. त्याबरोबरच, डिव्हाइसवर तुम्ही 10% बँक ऑफर देखील घेऊ शकता.

Vivo Y27 ची नवी किंमत

vivo y27

Vivo Y27 स्मार्टफोन कंपनीने 14,999 रुपयांना सादर केला होता. ज्याची किंमत आता 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. होय, Vivo Y27 तुम्हाला आता केवळ 13,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. ही किंमत डिव्हाइसच्या 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटसाठी आहे. यावर बँकद्वारे 10% सूट देखील मिळणार आहे.

Vivo Y22 ची नवी किंमत

तसेच, Vivo Y22 स्मार्टफोनच्या किंमतीतही वरील दोन्ही स्मार्टफोन्सप्रमाणे 1000 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. ही कपात मोबाईलच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेलसाठी आहे. जे आता 13,499 रुपयांना खरेदी करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, पूर्वी या स्मार्टफोनची किंमत 14,499 रुपये होती.

उपलब्धता

तिन्ही मोबाईल Vivo ची अधिकृत वेबसाइट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart आणि इतर रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo