Vivo ने Vivo X90 सिरीज भारतात लाँच केली. या सीरिज अंतर्गत Vivo X90 आणि Vivo X90 Pro सादर करण्यात आले आहेत. दोन्ही फोन आज विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, फोटोग्राफीसाठी Vivo X90 Pro सह 1 इंच लांबीचा Sony सेन्सर देण्यात आला आहे. आज हे दोन्ही फोन ऑफरसह खरेदी करता येतील. बघुयात किंमत आणि ऑफर्स –
Vivo X90 Pro च्या 12GB + 256GB व्हेरियंटसाठी किंमत 84,999 रुपये आहे. तर, Vivo X90 ची 8GB+256GB व्हेरिएंटसाठी किंमत 59,999 रुपये आणि 12GB+256GB व्हेरिएंटसाठी 63,999 किंमत आहे. त्याबरोबरच, यावर काही ऑफर्सही मिळणार आहेत. दोन्ही फोन मध्यरात्री 12 वाजतापासून खरेदी करता येतील.
हा फोन फ्लिपकार्ट, Vivo इंडिया ई-स्टोअर आणि सर्व पार्टनर रिटेल स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो. ग्राहकांना SBI, ICICI, HDFC आणि IDFC बँकांवर 10% पर्यंत कॅशबॅक मिळेल.
फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा 3D कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. Vivo X90 Pro आणि Vivo X90 सह Vivo ची V2 चिप ऑक्टा-कोर 4nm MediaTek Dimensity 9200 प्रोसेसर आहे. तर Android 13 आधारित Funtouch OS दोन्ही फोनवर उपलब्ध आहे.
बॅटरीबद्दल सांगायचे झाले तर, Vivo X90 Pro मध्ये 4,870mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये 50W वायरलेस चार्जिंग देखील आहे. तर, Vivo X90 सह 4,810mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगचे समर्थन आहे.
हे दोन्ही फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्यांसह येतात, जे Zeiss ब्रँडिंगसह येतात. Vivo X90 Pro मध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP, सेकंडरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल आणि तिसरा कॅमेरा 12 मेगापिक्सेल आहे.
तर, Vivo X90 मध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल आहे. इतर कॅमेर्यांमध्ये 12-12 MP चा डेप्थ आणि अल्ट्रा वाइड अँगल आहे. दोन्ही फोनमध्ये सेल्फीसाठी 32MP चा सेल्फीसाठी कॅमेरा आहे.