digit zero1 awards

 प्रीमियम Vivo X90 Proवर मिळतोय थेट 10 हजार रुपयांचा Discount, इतर ऑफर्सदेखील उपलब्ध। Tech News 

 प्रीमियम Vivo X90 Proवर मिळतोय थेट 10 हजार रुपयांचा Discount, इतर ऑफर्सदेखील उपलब्ध। Tech News 
HIGHLIGHTS

Vivo च्या सर्वात प्रीमियम स्मार्टफोन Vivo X90 Pro वर प्रचंड सवलत

Flipkart वर या फोनवर तुम्हाला थेट 10,000 रुपयांची सूट मिळणार आहे.

त्याबरोबरच, इतर ऑफर्सद्वारे हजारोंची बचत करण्याची संधी देखील उपलब्ध

स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo चा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन Vivo X90 Pro वर खूप मोठा डिस्काउंट दिला जात आहे. सणासुदीच्या काळात, हा फोन बंपर कॅशबॅक आणि EMI ऑफरसह खरेदी केला जाऊ शकतो. होय, ऑफर्समुळे हा महागडा फोन खरेदी करणे सोपे झाले आहे.

ऑफर्समुळे तुमच्या खिशाला जास्त ताण सुद्धा बसणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट 84,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. पण आता सणासुदीच्या काळात फोन ऑफर्ससह 10 हजार रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

vivo x90 pro
vivo x90 pro

Vivo X90 Pro वरील ऑफर्स

वर सांगितल्याप्रमाणे, या फोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट 84,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. सणासुदीच्या काळात हा फोन इ-कॉमर्स साईट Flipkart 74,999 रुपयांना खरेदी करता येईल. लाँच किंमतीपेक्षा हे 10,000 रुपयांनी स्वस्त आहे.

इतर ऑफर्स बद्दल बोलायचे झाल्यास, दोन आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. त्यापैकी एक 10,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक आणि दुसरी निवडक बँक कार्डसह 24 महिन्यांची नो कॉस्ट EMI ऑफर आहे. Cashify द्वारे फोन एक्सचेंज केल्यास 8,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील दिला जाईल.

vivo x90 pro
vivo x90 pro

यासोबतच Vivo V-Shield Protection Plan वर 40% सूट देण्यात आली आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही हा फोन फ्लिपकार्ट, विवो इंडिया ई-स्टोअर आणि सर्व रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता.

Vivo X90 Pro मुख्य स्पेक्स

फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ 3D कर्व डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. हा फोन MediaTek Dimensity 9200 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज उपलब्ध आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये पहिला सेन्सर 50MP चा आहे. दुसरा देखील 50MP चा आणि तिसरा 12MP चा आहे. आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 4870mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo