बहुचर्चित Vivo X90 सिरीज भारतीय बाजारपेठेत अखेर लाँच करण्यात आली आहे. Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन्स या सिरीजमध्ये समाविष्ट आहेत. हे दोन्ही फ्लॅगशिप मॉडेल कंपनीने ZEISS कॅमेरासह सादर केले आहेत. बघुयात किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स –
Vivo X90 : 8GB रॅमसह तुम्हाला 256GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल, ज्याची किंमत 59,999 रुपये आहे. तर, 12GB रॅमसह तुम्हाला फक्त 256GB स्टोरेज मिळेल, ज्याची किंमत 63 हजार 999 रुपये आहे.
Vivo X90 Pro : तुम्हाला हा हँडसेट फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येणार आहे. 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 84 हजार 999 रुपये आहे.
जर तुम्ही HDFC क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केले तर, तुम्हाला 8 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. जर तुम्हाला EMI द्वारे व्यवहार करायचे असेल तर तुम्हाला फोनवर 5,500 रुपयांची सूट मिळेल.
दोन्ही फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. तसेच, दोन्ही फोन्समध्ये मीडियाटेक डायमेंशन 9200 प्रोसेसर आहे. फोन जलद चार्ज करण्यासाठी Vivo X90 ला 120W वायर्ड चार्ज सपोर्ट मिळतो, ज्याची बॅटरी 4810mAh ची आहे. तर, X90 Pro मध्ये 4870 mAh बॅटरी आहे, परंतु या हँडसेटला X90 प्रमाणे 120W चार्ज सपोर्ट देखील मिळेल.
Vivo X90 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप येणार आहे. या सेटअपमध्ये 50MP IMX866 कॅमेरा, 12MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळेल. 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी मिळेल.
तर Vivo X90 Pro मध्ये 50MP IMX866 सेन्सर, 50-मेगापिक्सेल पोर्ट्रेट सेन्सर आणि 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. यामध्येही व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 1 इंच लांबीचा कॅमेरा सेन्सर तुम्हाला प्रो मॉडेलमध्ये मिळेल.