4GB रॅमसह येणारे विवो X7, X7 प्लस स्मार्टफोन लाँच
ह्या दोन्ही फोन्समध्ये स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स 4GB रॅमने सुसज्ज आहे. दोन्ही 64GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.
विवोने भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन विवो X7 आणि X7 प्लस लाँच केला. ह्या दोन्ही स्मार्टफोन्सचे फिचर्स एकसारखे आहेत. तथापि, ह्या दोन्ही फोन्समध्ये थोडे अंतर आहेत. ह्या दोन्ही फोन्समध्ये स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स 4GB रॅमने सुसज्ज आहे. दोन्ही 64GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.
विवो X7 स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची डिस्प्ले दिली आहे. तर X7 प्लसमध्ये 5.7 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. दोन्ही स्मार्टफोन्स पुर्ण HD सुपर AMOLED डिस्प्लेसह येतात. दोन्ही फोन्समध्ये १६ मेगापिक्सेलचे फ्रंट फेसिंग कॅमेरे देण्यात आले आहेत. तर X7 मध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. X7 प्लसमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हे दोन्ही ड्यूल सिम स्मार्टफोनसह येतात. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहेत. हे अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे.
हेदेखील पाहा – फ्लिपकार्टवर अशा ऑफर्स पुन्हा मिळणे नाही, आज आहे शेवटची संधी
विवो X7 स्मार्टफोनचा आकार 147.3 x 71.8 x 7.2mm आणि वजन 151 ग्रॅम आहे. X7 मध्ये 3000mAh बॅटरी दिली आहे. X7 प्लसमध्ये 4000mAh ची बॅटरी दिली आहे. विवो X7 स्मार्टफोन ७ जुलैपासून उपलब्ध होईल. ह्याची किंमत CNY 2,498 ($375) आहे. विवो X7 प्लस 15 जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
हेदेखील वाचा – शाओमी Mi मॅक्स स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरु
हेदेखील वाचा – नुकतेच लाँच झालेले हे स्मार्टफोन्स एकमेकांना देतात कडक टक्कर