मोबाईल निर्माता कंपनी विवोने आपले दोन नवीन स्मार्टफोन्स X6S आणि X6S प्लस लाँच केले. सध्यातरी कंपनीने ह्या दोन्ही फोन्सना चीनमध्ये लाँच केले आहे. ह्या दोन्ही फोन्सचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही म्यूझिक स्मार्टफोन आहेत. सध्यातरी कंपनीने ह्याची किंमत आणि उपलब्धतेविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. X6S आणि X6S प्लस स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन मागील वर्षी डिसेंबरमध्ये लाँच झालेल्या विवो X6 आणि X6 प्लस सारखेच आहेत.
जर विवो X6S स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.2 इंचाची पुर्ण HD सुपर AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. मात्र ह्या स्टोरेजला आपण वाढवू शकत नाही. ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. फोनमध्ये 2400mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा फोन अॅनड्रॉईड 5.1 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर, 4G कनेक्टिव्हिटी (भारतीय LTE बँड सपोर्टसह) सारखे फीचर्स आहेत. त्याशिवाय विवो X6S वायफाय, ब्लूटुथ 4.0, USB OTG सह मायक्रो-USB 2.0, GPS आणि FM रेडियोसारखे फीचर्ससुद्धा दिले आहेत.
तसेच जर विवो X6S प्लस स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.7 इंचाची पुर्ण HD सुपर AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे. फोनमध्ये 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्यात 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा फोन अॅनड्रॉईड 5.1 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर, 4G कनेक्टिव्हिटी (भारतीय LTE बँड सपोर्टसह) सारखे फीचर्स आहेत. त्याशिवाय विवो X6S वायफाय, ब्लूटुथ 4.0, USB OTG सह मायक्रो-USB 2.0, GPS आणि FM रेडियोसारखे फीचर्ससुद्धा दिले आहेत.
हेदेखील वाचा – आता लवकरच तुम्ही व्हॉट्सअपवरुन करु शकणार लँडलाइन आणि मोबाईल कॉल
हेदेखील वाचा – भारतात लाँच झाला सॅमसंग गॅलेक्सी J3 (6), किंमत ८,९९० रुपये