इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह Vivo X21 भारतात झाला लॉन्च
Vivo X21 35,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे आणि आज पासून फ्लिपकार्ट आणि Vivo च्या ऑनलाइन स्टोर्स वर डिवाइस ची विक्री सुरू होईल.
आज Vivo ने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन X21 भारतात लॉन्च केला आहे. याची सर्वात मोठी खासियत यातील अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. Vivo X21 35,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे आणि आज पासून फ्लिपकार्ट आणि Vivo च्या ऑनलाइन स्टोर्स वर डिवाइस ची विक्री सुरू होईल.
Vivo X21 स्मार्टफोन मध्ये 6.28 इंचाचा AMOLED फुलव्यू डिस्प्ले आहे ज्याच्या टॉप ला एक नॉच आहे, अशाच प्रकारचा नॉच कंपनी च्या मिड-रेंज डिवाइस V9 मध्ये दिसला होता. V9 प्रमाणे X21 च्या डिस्प्ले चे रेजोल्यूशन 1080 x 2280 पिक्सल आहे आणि हा फुल HD+ डिस्प्ले आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे आणि याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 90.3% आहे. स्मार्टफोन मध्ये ऑलवेज-ऑन डिस्प्ले फीचर पण आहे. Vivo X21 ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो आणि याची क्लोक्ड स्पीड 2.2 GHz आहे तसेच हा एड्रेनो 512 GPU सह येतो. Vivo X21 मध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे.
स्मार्टफोन मध्ये 12MP+5MP चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे जो डुअल पिक्सल टेक्निक, AI HDR आणि AI रिकोग्निशन सह येतो. 12MP सेंसर f/1.8 अपर्चर sah येतो तर 5MP सेंसर f/2.4 अपर्चर सह येतो. Vivo चा दावा आहे की AI सीन रिकोग्निशन 17 सीन डिटेक्ट करू शकतो आणि प्रत्येक वेळी यूजर्सना परफेक्ट शॉट कॅप्चर करण्यास मदत करतो. सेल्फी साठी Vivo X21 मध्ये 12 मेगापिक्सल चा सेंसर आहे जो f/2.0 अपर्चर आणि AI फेस ब्यूटी फेस फीचर्स सह येतो जो मशीन लर्निंग चा वापर करून चांगला सेल्फी एक्सपीरियंस देतो आणि हा 1080p वर फुल HD रेजोल्यूशन वाली विडियो रिकॉर्ड करण्यास सक्षम आहे. सेल्फी आणि विडियो व्यतिरिक्त फ्रंट कॅमेरा फेस रिकोग्निशन टेक्निक साठी पण अपग्रेड केला गेला आहे.
कनेक्टिविटी साठी हा डिवाइस Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac डुअल-बँड, ब्लूटूथ 5.0 लो एनर्जी, A-GPS सह GPS, GLONASS, BeiDou, FM रेडियो आणि 4G VoLTE ऑफर करतो. डिवाइस मध्ये 3200mAh ची बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. याचे मेजरमेंट 154.5 x 74.8 x 7.4mm आहे आणि याचे वजन 156.2 ग्राम आहे. Vivo X21 एंड्राइड 8.1 ओरियो वर आधारित Funtouch OS 4.0 वर चालतो.