Vivo X21 चा अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट वाला वर्जन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह गीकबेंच वर दिसला
आता पर्यंत मिड-रेंज श्रेणी मध्ये क्वालकॉम कडे स्नॅपड्रॅगन 660 पेक्षा पॉवरफुल कोणताही चिपसेट नाही आहे.
आता पर्यंत मिड-रेंज श्रेणी मध्ये क्वालकॉम कडे स्नॅपड्रॅगन 660 पेक्षा पॉवरफुल कोणताही चिपसेट नाही आहे. याव्यतिरिक्त जर स्मार्टफोन निर्माता कंपन्या आपल्या स्मार्टफोंस ला मिड-रेंज मध्ये लॉन्च करू इच्छित असतिल तर त्यांच्याकडे हा चिपसेट वापरण्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय पण नाही आहे. हे पाहून पण विवो आणि ओप्पो सारख्या मोठ्या कंपन्या पण आपल्या स्मार्टफोन्स मध्ये या चिपसेट चा वापर करत आहेत.
असा अंदाज लावला जात आहे की Vivo आपल्या Vivo X21 स्मार्टफोन ला स्नॅपड्रॅगन 670 सह लॉन्च करणार आहे, पण आता समोर आलेल्या माहिती नुसार आणि गीकबेंच च्या लिस्टिंग नुसार हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह समोर येऊ शकतो.
पण अजूनही अधिकृत पणे या स्मार्टफोन बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही की शेवटी याला 19 मार्चला लॉन्च करताना कोणत्या चिपसेट सह लॉन्च केले जाईल. असा पण अंदाज लावला जात आहे की या स्मार्टफोन ला वेगवेगळ्या वेरिएंट्स मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. विशेष म्हणजे गीकबेंच वर दिसलेल्या वर्जन ला पण अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह दाखवण्यात आले आहे.
Vivo X21UD स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी या लिस्टिंग मध्ये दिसला होता. या लिस्टिंग नुसार स्मार्टफोन ला एंड्राइड 8.1 Oreo, स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट आणि 6GB च्या रॅम सह लॉन्च केले जाऊ शकते. या लिस्टिंग मध्ये पण याला याच स्पेक्स सह दाखवण्यात आले आहे.
तसे पाहिले तर प्रोसेसर मागच्या वर्षी सारखाच आहे, पण याचा रॅम ला 4GB ने वाढविण्यात आले आहे. सोबत फिंगरप्रिंट सेंसर आता डिस्प्ले च्या आत गेला आहे. तसेच हा स्मार्टफोन एंड्राइड 8.1 Oreo वर चालेल, या स्मार्टफोन मध्ये हे काही लहान किंवा मग आपण म्हणु शकतो काही मोठे बदल झाले आहेत.