भारतात आपल्या लॉन्च च्या आधीच प्री-बुकिंग साठी उपलब्ध झाला अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला Vivo X21 स्मार्टफोन
Vivo X21 स्मार्टफोन 29 मे ला भारतात लॉन्च केला जाऊ शकतो पण याच्या लॉन्च च्या आधीच तुम्ही हा आर्डर करू शकता. या डिवाइस च्या प्री-बुकिंग साठी तुम्हाला Vivo Store वर Rs 2,000 एडवांस देऊन हा बुक करावा लागेल. पण याची अधिकृत किंमत समजली नाही.
सर्व अंडर डिस्प्ले वाल्या Vivo X21 स्मार्टफोन च्या भारतातील लॉन्च साठी उत्सुक आहेत. हा डिवाइस भारतात 29 मे ला एका इवेंट मध्ये सादर केला जाऊ शकतो. पण Vivo ने आपल्या अधिकृत स्टोर मधून या डिवाइस ची प्री-बुकिंग प्रक्रिया सुरू केली आहे. याचा अर्थ असा की यूजर्सना दिलासा दिला जात आहे की त्यांच्यापर्यंत हा डिवाइस लवकरच पोहोचेल. पण याबद्दल आत्तापर्यंत कोणतीच माहिती मिळाली नाही की हा डिवाइस भारतात फ्लॅश सेल मॉडेल ने सेल केला जाईल की यासाठी ओपन सेल ठेवला जाईल. त्याचबरोबर कंपनी ने याची भारतातील अधिकृत किंमत पण सांगितली नाही त्यामुळे आता हा बूक करून तुम्हाला याच्या लॉन्च च्या वेळी किंमत ऐकून झटका पण लागू शकतो किंवा आनंदही होऊ शकतो.
हा डिवाइस प्री-बुक करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, ज्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विशेष म्हणजे अजून हेही समोर आले नाही की हा फोन किती स्टोरेज वेरिएंट्स मध्ये सादर केला जाईल, पण जर तुम्हाला डिवाइस घ्यायचा असेल तर सर्व काही बाजूला ठेवून तुम्हाला फक्त Rs 2,000 चे एडवांस पेमेंट करून या डिवाइस साठी प्री-बुकिंग करावी लागेल. तुम्ही ही अमाउंट देताच तुम्ही दिलेल्या ईमेल ID वर एक कूपन मिळेल जो Rs 2,000 चा असेल. यानंतर हा डिवाइस 29 मे ला लॉन्च होऊन सेल साठी आल्यावर तुम्हाला तुमच्या आवडीच्या स्टोरेज वेरिएंट ची निवड करायची आहे आणि तुमच्या या कूपनला तिथे अप्लाई करायचे आहे, त्यानंतर उरलेली रक्कम देऊन तुम्हाला हा फोन विकत घेता येईल.
या प्री-बुकिंग प्रक्रिया मध्ये तुम्हाला काही फायदे पण होणार आहेत, जे लोक या डिवाइस साठी प्री-बूकिंग करतील, त्यांना सर्वात आधी Rs 1,000 चे एक गिफ्ट वाउचर तुम्हाला मिळेल. जो तुम्ही Ferns N Petals वर जाऊन क्लेम करू शकता. त्याचबरोबर 12 महिन्यांसाठी तुम्हाला नो कॉस्ट EMI चा ऑप्शन पण मिळेल. तसेच जे लोक हा स्मार्टफोन विकत घेण्यासाठी आपल्या SBI च्या क्रेडिट कार्ड चा वापर करतील त्यांना 5 टक्क्यांचा कॅशबॅक पण दिला जाईल. तसेच जे लोक वोडाफोन वर आहेत, त्यांना वर्षभराच्या डिवाइस सिक्यूरिटी प्लान सह 280GB मोबाइल डाटा पण मिळेल.
भारतातील या डिवाइस च्या किंमती बद्दल बोलायचे तर ते घाईचे ठरेल, पण काही लीक्स आणि रुमर्स याच्या किंमत बद्दल पण आले आहेत. तुम्हाला तर माहीतच आहे की हा डिवाइस आधी अनेक देशांमध्ये लॉन्च झाला आहे आणि आम्हाला तिथल्या किंमती माहीत आहेत. पण भातासाठी असे बोलले जात आहे की याचा 64GB वेरिएंट Rs 29,900 आणि 128GB वेरिएंट जवळपास Rs 37,000 च्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.