Vivo X200 Series Launched
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo ने नुकतेच भारतात आपला नवा बजेट फोन Vivo Y19e लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Vivo X200 Ultra स्मार्टफोन पुढील महिन्यात लाँच होऊ शकतो. स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच या फोनचे लीक देखील पुढे येऊ लागले आहेत. लीक अहवालांमध्ये, स्मार्टफोन्सची खास फीचर्स समोर आली आहेत. ताज्या लीकमध्ये, या स्मार्टफोनच्या स्पेशल स्पेसिफिकेशन्स, कॅमेरा, डिस्प्ले इ. बद्दल माहिती समोर आली आहे.
Also Read: Best Smartphones Under 15000: कमी किमतीत 8GB RAM सह लेटेस्ट फोन्स, Samsung, Realme चे फोन्स उपलब्ध
Vivo X200 Ultra स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स उपलब्ध असतील. अलिकडेच प्रसिद्ध प्रकाशकाने फोनच्या खास फीचर्सचा खुलासा केला आहे. याव्यतिरिक्त, Vivo चे उत्पादन प्रमुख Han Boxiao यांनी देखील फोनच्या कॅमेऱ्याबद्दल एक संकेत दिला आहे. DCS नुसार, Vivo च्या या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 6.82-इंच लांबीचा 2k+ LTPO BOE क्वाड कर्व्ह डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. फोनमध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर असेल.
एवढेच नाही तर, फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनचे अपेक्षित कॅमेरा स्पेक्सदेखील पुढे आले आहेत. लीकनुसार, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 200MP चा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा सेन्सर असेल. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP चा कॅमेरा असेल. याव्यतिरिक्त, पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी या फोनला IP68 आणि IP69 रेटिंग मिळेल.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, Vivo च्या उत्पादन व्यवस्थापकाने अधिकृतपणे पुष्टी केली की, X200 अल्ट्राचा कॅमेरा सेटअप 14 मिमी, 35 मिमी आणि 85 मिमीच्या मूळ फोकल लांबीचा असेल. त्यांनी असेही सांगितले की, पेरिस्कोप लेन्स हा स्मार्टफोनमध्ये वापरला जाणारा सर्वात मोठा लेन्स असेल, जो X100 अल्ट्रालाही मागे टाकेल. f/2.27 अपर्चरसह फोन जास्त लाईट कॅप्चर करण्यास सक्षम असेल. यामुळे लो लाईटमध्येही चांगले फोटो काढण्यास मदत होईल.