प्रतीक्षा संपली! 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo X100 Series भारतात अखेर लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 

प्रतीक्षा संपली! 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo X100 Series भारतात अखेर लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

बहुप्रतीक्षित Vivo X100 सीरीज अखेर भारतात लाँच

दोन्ही फोनमध्ये चांगला AMOLED डिस्प्ले आहे, जो स्मूथ टच अनुभव देतो.

उत्तम कॅमेरा सेटअपसह तुम्हाला क्लासिक फोटोज क्लिक करता येतील.

मागील काही काळापासून प्रतीक्षेत असलेली Vivo X100 सीरीज अखेर भारतात लाँच झाली आहे. या लाइनअप अंतर्गत Vivo X100 आणि Vivo X100 Pro भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, दोन्ही फोनमध्ये चांगला AMOLED डिस्प्ले आहे, जो स्मूथ टच अनुभव देतो. याशिवाय, दोन्ही फोनमध्ये उत्तम कॅमेरा सेटअप देखील आहे. याद्वारे तुम्ही क्लासिक फोटोज क्लिक करण्यास सक्षम असाल. बघुयात लेटेस्ट सिरीजची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Vivo X100 सिरीजची भारतीय किंमत

Vivo X100 भारतीय बाजारात 12GB+256GB आणि 16GB+512GB अशा दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 68,999 रुपये आहे. तर, फोनच्या 16GB+512GB व्हेरिएंटची किंमत 74,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

या फोनच्या टॉप व्हेरिएंट म्हणजेच Vivo X100 Pro 16GB + 512GB स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत 96,999 रुपये आहे. फोनचे प्री-बुकिंग आजपासून म्हणजेच 4 जानेवारीपासून सुरू झाले आहे.

Vivo X100 Pro Unboxing Video
Vivo X100 Pro

हे सुद्धा वाचा: Oppo Reno11 Series ची लाँच डेट जाहीर, Reno11 Pro आणि Enco Buds2 मिळतील Free?

Vivo X100 सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

दोन्ही स्मार्टफोनची डिझाईन सारखीच आहे. दोन्ही फोनमध्ये 120Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.78-इंच लांबीचा FHD प्लस AMOLED डिस्प्ले आहे. या लाइनअपच्या स्टॅंडर्ड मॉडेलमध्ये फ्लॅट स्क्रीन आहे, तर प्रो व्हेरियंटमध्ये कर्व डिस्प्ले आहे.

प्रोसेसर

दोन्ही फोन MediaTek Dimensity 9300 चिपसेटसह 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह येतात.

कॅमेरा

Vivo X100 मध्ये 3x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करणारा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात पहिला 50MP प्रायमरी सेन्सर, दुसरा 64MP पेरिस्कोप लेन्स आणि तिसरा 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे.

Vivo X100 series price
Vivo X100 series price

या व्यतिरिक्त, प्रो व्हेरियंटमध्ये म्हणजे Vivo X100 Pro, 50MP 1 इंच मुख्य सेन्सर आणि इतर लेन्स बेस व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनचे कॅमेरे ZEISS प्रमाणित आहेत. त्याबरोबरच, Vivo X100 आणि X100 Pro मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा आहे.

बॅटरी

Vivo X100 मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 120W वायर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर, त्याचा प्रो मॉडेल म्हणजेच Vivo X100 Pro मध्ये 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5,400mAh बॅटरी मिळेल.

फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी दोन्ही फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखी फीचर्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo